आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो ! ते असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही….!!

0
78

जो पर्यंत बिभीषण लंके मध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले पण बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता....!!

परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भगवंतवत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही....!!* *अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तिर्थ यात्रेला जावे. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले,कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही....!!* *याचप्रकारे आपल्या कूटूंबात अथवा मित्र परीवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद राहतो..*

विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा मनापासून आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो ते माहित नाही कुणाच्या पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते….!! आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगा व देवाची भक्ती करत रहा....!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here