सौ. जयश्री नामदेव पारस्कर या विवाहितेवर खुनी हल्ला !मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदुरा सोनज रेल्वेगेट परीसरातील घटना !!

0
2411

 ब्रेकिंग न्युज !
नांदुरा: जगदिश आगरकर
या बाबत अधिक वृत्त असे कि, नांदुरा दहीगांव रस्त्यावरील सोनज रेल्वे गेट परीसरात घडलेल्या या वृतानुसार २ भगीनी आपल्या टुव्हिलर वाहनाने जिगांव येथे जात असतांना मोटारसायकलवर मागुन आलेल्या २ अज्ञात ईसमांनी त्या महिलांचे वाहनासमोर गाडी आडवी लाऊन रस्ता अडविला.
मोटारसायकल वरून खाली ऊतरून काही कळायच्या आतच त्या दोघींचे डोळ्यात मिरची पावडर फेकली. यातील एकाने वाहनावर मागे बसलेल्या सौ. जयश्री नामदेव पारस्कर (वय अंदाजे ३० ) रा. भोटा ता. नांदुरा हिचे हाताने डोक्याचे केस धरून रस्त्यावर आपटले मारहान करीत त्या महिलेच्या तोंडावर हातातील विळ्या सारख्या वस्तुने अनेक वार केल्यामुळे ती रस्त्यातच रक्त बंबाळ होऊन निपचीत पडली होती. तर सोबत असणार्‍या ईसमाने वाहन चालविणार्‍या मुलीस रस्त्यावर ढकलले व मारहान केली.अशा आशयाचे बयान जखमी महिले सोबत असणार्‍या मुलीने नांदुरा पोलिसांना दिले आहे.
आकस्मीतपणे झालेल्या खुनी हल्यानंतर ते दोघेही अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटना मंगळवार सायंकाळी ५।। वाजेदरम्यान घडली आहे.
घटना घडल्यावर जाणार्‍या येणार्‍यांची गर्दी जमली त्यातील एकाने सदर घटनेची माहिती ओमसाई फाऊंडेशन चे विलास निंबोळकर यांना कळविताच क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातचे काम सोडुन आपले सहकारी प्रविणभाऊ डवंगे(सकाळ प्रतिनिधी) यांचेसह एम्बुंलंस घेऊन सोनज गेटजवळ घटनास्थळी हजर होऊन रक्ताच्या थाळोळ्यात पडलेल्या सौ. जयश्री नामदेव पारस्कर या महिलेस तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदुरा येथे दाखल केले.
शासकिय दवाखाण्याचे वैध्यकिय अधिकारी डाॅ. लक्ष्मीनारायण जैसस्वाल, त्यांचे स्टाॅप यांनी तातडिने सलाईन,ईंजेक्शन ईत्यादी प्राथमीक ऊपचार करून सदर जखमी महिला पेशंटला पुढिल ऊपचारासाठी खामगांव रूग्नालयात रेफर केलेले आहे.
नांदुरा पोलीस स्टेशन आॅफीसर सुरेश नाईकनवरे यांचे मार्गदर्शनात सदर घटनेची माहिती घेऊन महिलेवर भररस्त्यात हल्ला करणार्‍या अज्ञात आरोपीचां शोध तातडिने घेण्यासाठी सुचना दिल्या.
नांदुरा सोनज रेल्वेगेट पर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ माॅर्निग / ईव्हिनिंग वाॅक करण्यासाठी अनेक महिला,पुरूष पायदळ जात येत असतात. आजची घटना समजल्यावर त्यांना सुध्दा भिती वाटल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here