बाळासाहेब नेरकर, अकोला जिल्हा प्रतिनिधि
- कमलाबाई पाचरुटकर (गिरड) जि.वर्धा आणि पिडीत कुमुदताई क्षिरसागर (भंडारा)जि. भंडारा कुटुंबास 36000/-रु रोख व ईलेक्ट्रिक प्रेस चा दिला मदतीचा हात !!

महाराष्ट्र धोबी (परीट) समाज महासंघ सर्वभाषिक चे संस्थापक अध्यक्ष श्री. देवरावजी सोनटक्के हे महासंघाचे माध्यमातुन धोबी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, विज बिल आणि ईतर न्याय मागण्याकरीता नेहमीच शासनदरबारी संघर्षरत असतात.
याचबरोबर महाराष्ट्रात कुठेही धोबी समाजावर नैसर्गिक आपत्ती कोसळली कि, ते आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यां सोबत त्या पिडीत कुटुंबाच्या मदती करीता, त्याचे पुर्नवसना करीता विनाविलंब धाऊन जातात. मागील दिवसात भंडारा येथिल कुमुदताई क्षिरसागर आणि गिरड जि.वर्धा येथील कमलाबाई पाचरुटकर या कष्टकरी निराधार महीलांच्या लॉन्ड्री दुकान, व घराला आग लागुन त्यांचे संसार उघड्यावर पडल्याचे निदर्शनास येताच. सर्वभाषिक महासंघाचे पदाधिकार्यांनी निधी गोळा करुन संस्थापक अध्यक्ष देवराव सोनटक्के यांच्या हस्ते भंडारा येथिल कुमुदताई क्षिरसागर यांना ६,०००/-रु. व इलेक्ट्रिक प्रेस आणि गिरड जि.वर्धा येथील कमलाबाई पाचरुटकर याना ३०,०००/-रु.(तीस हजार) रोख रक्कम देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याकरीता मोलाचा हातभार लावला.
*या मदतनिधी मध्ये संस्थापक अध्यक्ष आदरणिय देवरावजी सोनटक्के साहेब, कार्याध्यक्ष अनिल शिंदे,संजयजी कनोजिया, रुकेशजी मोतीकर, दयारामजी हिवरकर, भैय्याजी रोहणकर, मानिक भोस्कर ,सुनील पवार,डॉ.प्रा.राजेश क्षीरसागर,वर्धा जिल्ह्यातील महाराष्ट्र धोबी (परीट) समाज महासंघ सर्वभाषिक चे जिल्हाध्यक्ष संजयभाऊ भोवरे यांच्या आव्हानाला शिरसावंद्य मानुन ,लाॅन्ड्री असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष गुणवंत भोवरे, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख संजय भोंग, दिलिपभाऊ भोवरे उपाध्यक्ष ,सागर किनकर,आशिष मोतिकर,प्रविन जुनघरे, संजय खल्लारकर, सचिन जुनघरे, विजय लोणकर, जितेंद्र हिवरकर, संजय नांदे, रविकांत डोळसकर, विवेक(बंडुभाऊ) भोवरे,रामेश्वरराव वाघमारे,अरुणराव भोवरे, नंदकिशोर तुरणकर, गिरिष भोवरे, अनिल भोवरे, गजानन मस्के, जयप्रकाश सोनुरकर, दिलिप पाटील सुनिल पाटणकर, गणेश हिवरकर, यांनी अल्पावधित आर्थिक योगदान दिले.त्याचप्रमाणें सर्वभाषिक महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष विजय चटप, भंडारा शहर अध्यक्ष नारायण पालवे, जिल्हाध्यक्ष जयंत क्षिरसागर, भंडारा महिला जिल्हाध्यक्षा सौ प्रितीताई भिलकर,अनिल क्षिरसागर शहर कोषाध्यक्ष यांचे मोलाचे आर्थिक योगदान लाभले असे प्रसीद्दीप्रमुख सजय रामचद्र भोग यानी प्रसीद्दी करीता दिलेल्या पञकात दिलेृ