वारी येथील अनिल दारोकार यांचे शेतातील वाडग्याचे कूलूपकोडां तोडुन दोन गाई लंपास !

0
280

बाळासाहेब नेरकर,प्रतिनिधी, जगदिश न्युज

अनिल सहदेव दारोकार यांचे वारी हनुमान गावालगत शेत सर्वे नंबंर 62/4 असुन शेतात टिनाचे शेड असलेल्या खोपडी वजा वाडगे बांधलेले असून दोन लाल रंगाच्या गाई बांधलेल्या होत्या चोरट्यांनी शेतात कुणीही नसल्याची पाळत ठेवून दिनांक २०/११ चे रात्रीला शेतात असलेल्या कुत्रांना मांस टाकुन बांधुन ठेवले व घराचे दरवाज्याचे कूलूप कोंडा तोडुन दोन्ही गाई अंदाजे कीमत ३५ हजार चोरुन नेल्या .

सकाळी शेतमालक शेतात गायीला चारापानी व दुध काढनेसाठी गेले असता घराचे कुलूप कोडांतोडलेला दिसला व दोन्ही गायी चोरुन नेल्याचे दिसुन आले.

या घटनेची कैफियत हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली असून ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विठ्ठल वाणी, गोपाल दातीर व त्याचे सहकारी यांनी फिर्याद दाखल करुन घेतली असून अधिनियम ३ भारतिय दंंडसहीता १८६० नुसार .कलम३७९ दाखल करुन पुढिल त्या बिट चे अधिकारी पुढिल तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here