तलाठी अनिल अंभोरे यांची तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या !

0
4032
मृत्तक तलाठी अनिल अंभोरे, तहसील कार्यालय, नांदुरा

रोषण आगरकर, (ऊपसंपादक, जगदिश न्युज)
नांदुरा जि. बुलढाणा शहरातील तलाठी पदावर नोकरीवर असलेल्या ईसमाने नांदुरा तहसील कार्यालयाचे वाॅशरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना गुरूवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे समजले की ?, नांदुरा तहसील कार्यालयाचे अधिनस्थ असलेले तलाठी अनिल अंभोरे यांनी आज सकाळी विमनस्क अवस्थेत घराबाहेर निघाले रस्त्यात एका वाहन चालकास त्यांनी रस्त्यात थांबऊन चाकुचा धाक दाखऊन मला नांदुरा तहसील कार्यालयात पोहचऊन दे ! घाबरलेल्या वाहन चालकाने त्यांना तहसील कार्यालयाचे गेट पर्यंत पोहचविले होते.
दरम्यान सकाळची वेळ असल्यामुळे तुरळक कर्मचारी परीसरात दिसत होते.सफाई कर्मचारी कार्यालयातील सफाईचे काम करण्यात व्यस्त होते.
दरम्यान तलाठी अनिल अंभोरे यांनी तहसीलदार यांचे मुख्य केबीनमध्ये प्रवेश केला तेथे तहसीलदार ऊपस्थित नव्हते तेंव्हा त्यांचे केबीन मधिल वाॅशरूम मध्ये प्रवेश करून आपल्या सोबत आणलेली दोरी खिडकीस बांधली व स्वत:चे गळ्यास बांधुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तहसीलदार यांचे केबीनमध्ये कुणीतरी ईसमाने आत्महत्या केल्याचे वृत्त नांदुरा शहरात पसरताच एकच खळबळ ऊडाली होती.
कुण्या शेतकर्‍याची वीज कट केल्यामुळे कुणी आत्महत्या केली कि संचारबंदी मुळे अशा चर्चा सुरू होत्या
आमचे जगदिश न्युज चे ऊपसंपादक रोषण आगरकर यांना घटनेचे वृत्त समजताच तात्काळ नांदुरा तहसील कार्यालय गाठुन प्रत्यक्षात वरील प्रमाणे तलाठी अनिल अभोंरे यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसुन आले.यावेळी कर्मचारी, पोलिस अधिकारी,पत्रकार बांधव ऊपस्थीत होते.
सदर घटनेचे वृत्त समजताच बंगल्यावर असलेले तहसीलदार मा. राहुल तायडे साहेब यांनी तहसील कार्यालयातील आपल्या केबीन मधिल घटनास्थळ वाॅशरूम चे निरीक्षण केले व सर्वप्रथम पोलिस प्रशासनाला सुचित केले होते.
मय्यत तलाठी अनिल अंभोरे गेल्या १ वर्षापासुन आपली कार्यालयीन कामे सुध्दा करीत नव्हते अशा अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या पण लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच केल्या जात होते. शेवटी स्वत:चे लहरीपणामुळे त्यांनी स्वत:च आपले जीवन संपवीले. तलाठी अनील अंभोरे नांदुरा शहरात भाड्याचे घरात राहत होते. त्यांचे मुळगांव घाटबोरी ता. मेहेकर होते. घटनेचे वृत्त समजल्यावर त्यांची पत्नी मंगलाबाई अंभोरे व आदित्य व विशाल अशा दोन मुलांनी नांदुरा तहसील कार्यालय गाठले होते त्यावेळी त्यांचा शोक अनावर झाल्याचे दृष्श दिसुन येत होते.
पोलिस पंचनामा झाल्यावर त्यांचे शव पोस्टमार्टम करण्यासाठी रवाना करण्यात आले होते.पुढिल तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here