
राजेंद्रजी दिक्षीत, अमरावती
अमरावती जिल्हातील ग्राम कठोरा येथील ग्रामपंचायत ने सर्वानुमते घेतलेल्या अभिनंदनीय ठरावानुसार देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न कर ता निःस्वार्थ पणे देशाचे संरक्षण करणाऱ्या व त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता गावातील सर्व सैनिकांना भावनिक दिलासा देने व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्यासाठी अमरावती तालुक्यातील कठोरा बु ग्रामपंचायतिने घर टॅक्स माफ करण्याचा ठराव नुकत्याच दिनांक १६/४/२०२१ चा झालेल्या मासिक सभेत घेतला.
अमरावती तालुक्यातील कठोरा बु ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री विलासभाऊ महल्ले व खरेदी विक्री चे अध्यक्ष श्री प्रशांतभाऊ काळबांडे यांच्या नेतृत्वात आपले बहुमत सिद्ध करीत ग्रामपंचायत ताब्यात घेतली व या ग्रामपंचायत मार्फत गावात अनेक बाबीच्या पूर्ण योजना राबवायला सुरवात केली. याचाच एक भाग म्हणून गावातील सध्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचा घर टॅक्स माफ करण्यात आला.
यावेळी कठोरा (बु) येथिल सरपंच श्री मंगेशभाऊ महल्ले, उपसरपंच सौ संगीता भालेराव, सदस्य श्री विनोद भालेराव,श्री प्रवीण अळसपुरे,श्री गजेंद्र काळबांडे, जया काळबांडे, प्रतिभा ठाकरे, अर्चना निमकर, राम खंडार, खडसे, तंतरपालळे, ग्रामसेवक कु वंदना गोपाळे, ग्रामपंचायत कर्मचारी राजु खडसे, इंगोले, नंदकुमार देशमुख, उमेश खडसे, वैभव सोनोने उपस्थित होते.

