अकोल्यातील भावी जिल्हाधिकाऱ्याचा अखेर कोरोनाने घेतला बळी !

0
1722

बाळासाहेब नेरकर,अकोला जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या तरुणाची आठवडाभरापासून सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झूंज अखेर अपयशी ठरली आहे. शुक्रवारी रात्री हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.
कोरोनामुळे फुफ्फुस बाधित झाल्यानंतर सामान्य कुटुंबातील आईवडिलांनी मुलाचा जीव वाचावा यासाठी नातेवाईकांच्या मदतीने 55 लाख रुपये जोडून  उपचार करण्यासाठी  एअर एम्बूलंस द्वारा सोमवारी हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला हलवले होते. तेथे उपचाराला प्रतिसाद देत असताना शुक्रवारी प्रांजलचा मृत्यू झाला आहे.
पातुर तालुक्यातील तांदळी गावच्या प्रांजलने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि कठोर परिश्रमातून यूपीएससी ही परीक्षा पास केली; मात्र गत आठवड्यात प्रांजलला कोरोनाने गाठले. अकोल्याच्या खाजगी इस्पितळात दाखल केल्यानंतर प्रांजलची तब्येत अत्यंत गंभीर झाली त्यामुळे प्रांजलचे फुफ्फुस अतिशय नाजूक अवस्थेत होते. त्यास हैदराबाद येथे हलविले असता त्याचा आज मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here