महिलांनी सुद्धा रक्तदान करण्याचे आवाहन
बाळासाहेब नेरकर,हिवरखेड.१५ मे.
हिवरखेड येथील एक हात मदतीचा फौंडेशनच्या वतीने,डॉ.बी.पी. ठाकरे ब्लड बँक अकोल्याच्या सौजन्याने आज दि.१६ मे रोजी येथील राजबुवा संस्थान बारगण पुरा हिवरखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.सध्या अनेक रुग्णालयातून रक्ताची मागणी वाढत आहे.रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी रक्ताच्या तुटवड्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.कोरोना लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही.त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावण्यासाठी एक हात मदतीचा फौंडेशनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.सकाळी ९ वा. पासून सुरू होणाऱ्या रक्तदान शिबिरात महिलांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान करावे त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तरुणांनी सुद्धा या आव्हानात्मक परिस्थितीत पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजक शुभम अस्वार,अमोल रेखाते, प्रशांत रेखाते,रुपेश भोपळे, दिपक रेखाते,दिपक भोपळे, विशाल हागे,सागर राऊत,अक्षय ढोकणे व त्यांच्या एक हात मदतीचा फौंडेशनच्या मित्रमंडळीने केले आहे.मागच्या वर्षी सुध्दा याच वेळी एक हात मदतीचा फाऊंडेशनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते हे विशेष.