गडचिरोली जिल्हातील पैडी जंगल परीसरातील चकमकी दरम्यान पोलिसांकडून कसनसुर दलम च्या १३ नक्षलवाद्यांचा खात्मा !

0
49
महाराष्ट्राचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे ( पाटील ) यांनी गडचिरोलीत पोहोचुन शुर पोलीस दलाचे अभिनंदन केले.

गडचिरोली : जिल्हा प्रतिनिधी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांना 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. गडचिरोलीतील पैडी जंगलात परीसरात महाराष्ट्र पोलिसांचे कारवाईत ही कामगीरी बजावण्यात आली.

डीआयजी संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कसनसुर दलमचे 13 नक्षलवादी ठार झाले आहेत.
त्याचबरोबर एटापल्लीच्या जंगलात 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर काही नक्षलवादी गंभीर जखमी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू होती.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाइटने हल्ला केला होता. नक्षलवाद्यांचा हा प्रयत्न अत्यंत मोठी घटना होती. तेंव्हा पासुन पोलीस चांगलेच सतर्क झालेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here