अखेर पिसाळलेल्या माकडाला वनविभागाने केले जेरबंद ! नगरीकांना चावा घेत असल्याने परिसरात होती दहशत !!

0
95
जगदिश न्युज चॅनल व्हिजीटर संख्या ९६ हजार ६२०

रोषण आगरकर,ऊपसंपादक, जगदिश न्युज

नांदुरा दि.२९- तालुक्यातील निमगाव येथे मागील पाच दिवसांपासून पिसाळलेले एक माकड नागरिकांना चावा घेऊन जखमी करीत असल्याने गावात त्या माकडाची चांगलीच दहशत पसरली होती.

दरम्यान या प्रकाराची माहीती वनरक्षक पठान साहेब यांना मळताच त्यांनी आपल्या वरीष्ठ वनाधिकार्‍यांना या बाबत सुचित करून त्या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी बुलढाणास्थित रेस्कु टिम पाठविण्याची विनंती केली होती.

बुलढाणा वन विभागाची रेस्कु टिम आपल्या स्पेशल पिंजरा असलेल्या वाहनासह दि.२९ जूनच्या दुपारी ३ वाजता वाजेदरम्यान निमगांव ता. नांदुरा गावात दाखल झाली होती. या प्रसंगी गावपरीसरात मोठ्या संख्येने बध्यानीं गर्दी केली होती. शेवटी वनविभागाचे चमुने आपल्या वाहनावर असलेल्या ध्वनिक्षेपनातुन आवाहन करून जनतेने सहकार्य केले तर आम्ही त्या त्रास देणार्‍या माकडास जिवंत पकडु शकतो ! सदरचे आवाहनाला योग्य तो प्रतिसाद मिळाल्यावर सदर माकडास सुखरूपरीत्या जेरबंद करण्याचे अभियान राबविण्यात आले होते.

बहुतांशपणे सर्व माकडांचे टोळीमधिल माकडे सारखीच दिसत असल्यामुळे नेमके त्रास देणारे माकड कोणते ? याचा शोध घेणे सुरू असतांना सर्व माकडांच्या ईकडुन तिकडे माकडऊड्या सुरू होत्या. दरम्यान एका झाडावरून दुसर्‍या ईमारतीवर जाऊन बसलेल्या माकडाला नवविभागाचे शार्पशुटर ने स्टेशल बंदुकीच्या माध्यमातुन नेम बेशुध्द करणारे ईंजेक्शन चा वार केला असता ते तथाकथीत माकड अवघ्या ५ मिनिटात तेथील गच्चीवर बेशुध्द झाले होते. सदर ईमारतीवरून त्यास सुरक्षीतपणे जेरबंद करून खाली आणले व वाहनातील पिंजर्‍यात जेरबंद करून त्याचेवर प्राथमीक ऊपचार करून त्याला ज्ञानगंगा जंलात सोडण्यात आल्याची माहिती वनरक्षक पठाण साहेब यांनी दिली.

निमगांव येथे दाखल झालेल्या वनविभागाचे रेस्कुटिम मध्ये पठान साहेब , (वनरक्षक) संदिप मडावी,जगताप वनपाल,सातव वनपाल, यांचेसह त्यांना सहकार्य करणारे निमगांव सरपंच कुंवारे,पाऊलझगडे सर,ए.आर. फाटे सर,गजानन ईंगळे,किसनराव भगत,अक्रम शेख, मंजुरभाई,आरीफभाई यांचेसह अनेकांनी परीश्रम घेतले होते ! हे विषेश !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here