रोखठोक संजय…..!निर्भया, कोपर्डी, खैरलांजी,वन अधिकारी दीपाली चव्हाण मॅडम, बीड येथील पूजा चव्हाणया माझ्या बहिणींना न्याय केव्हा मिळेल……….?

0
170

रोखठोक संजय च्या माध्यमातून
समाजातील न्याय व्यवस्थेबद्दल मला काही बोलायचे आहे.
13 जुलैला कोपर्डी येथील प्रकरणाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तरीपण सुद्धा कोपर्डी येथील अन्यायग्रस्त ताईच्या नराधमांना, खुनी गुन्हेगारांना अद्यापही न्यायव्यवस्थेच्या कमकुवतपणा मुळे वडीसा कारभारामुळे अपील पद्धतीमुळे अद्यापही न्याय मिळाला नाही त्या नराधमांना फाशी झाली नाही याबद्दल मला फार दुःख होत आहे.
याप्रकरणात सारखेच भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी चा प्रकरण या प्रकरणांमध्ये सुद्धा भूत मांगे कुटुंबातील माझ्या बहिणींना न्याय मिळाला नाही व त्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली गेली नाही अद्यापही नागपूर खंडपीठ मध्ये ही केस पेंडिंग आहे त्या केसचा तेव्हा निकाल लागेल केव्हा माझ्या बहिणींना न्याय मिळेल.
मेळघाटमधील शेरणी वनाधिकारी दीपाली चव्हाण मॅडम यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आपल्या निवासस्थानी हरिसाल ला स्वतःच्या रिवॉल्वरने आत्महत्या केली, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठांचा त्रास होता याचा सर्व आत्मकथन पत्रात लिहिलं होतं. मेळघाट मधून बदली होण्यासाठी त्यांनी महिला बाल विकास अधिकारी यशोमती ठाकूर मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून बदली करण्यासंदर्भात विनंती अर्ज व विनंती केली तरीपण यशोमती ठाकूर यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं शेवटी दीपाली चव्हाण मॅडम यांनी आत्महत्या केली, या आत्महत्या वन विभागातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहे त्याचप्रमाणे यशोमती ठाकूर व वनमंत्री संजय राठोड हेसुद्धा जबाबदार आहे यांच्यावर सुद्धा कार्यवाही करण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या मुलीने पुण्याला आत्महत्या, केली याबाबत युट्युब मध्ये पूजा चव्हाण वनमंत्री संजय राठोड यांच्या संभाषणाच्या अनेक व्हिडीओ क्लिप होत्या. संजय राठोड पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो त्यामध्ये होते. ज्यावेळेस पूजा चव्हाण ची हत्या झाली त्यावेळेस त्या ठिकाणी संजय राठोड यांचे दोन कार्यकर्ते तिथे होते, येत्या प्रकरणाचे प्रथमदर्शी पुरावे आहेत. त्यांनी आपल्या जबाबा मध्ये पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्याप्रकरणी वती गर्भवती असण्यामागे वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग आहे असे सर्वे पुरावे असताना सुद्धा पुणे येथील पोलिसांनी संजय राठोड वनमंत्री व त्यांचे दोन कार्यकर्ते यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणी कोणत्याही प्रकारचा एफ आय आर दाखल केला नाही, हे प्रकरण मीडियामध्ये खूप गाजलं पंधरा दिवस वनमंत्री संजय राठोड गायब होते. त्यानंतर पोहरादेवी येथे तमाशा केला. उद्धव ठाकरे सरकार वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, यावरून पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड हे पूर्णता दोषी आहे हे सिद्ध होते, तरीपण न्यायालयीन कार्यवाही शून्य आहे.
कोपर्डी प्रकरण असो, निर्भया प्रकरण असो, खैरलांजी प्रकरण असो, वनाधिकारी दीपाली चव्हाण मॅडमचा प्रकरण असो, बीड येथील पूजा चव्हाण प्रकरण असो.
यांच्यासारख्या अन्यायग्रस्त पीडित माझ्या बहिणींना न्याय केव्हा मिळेल हा प्रश्न मला पडलेला आहे. न्यायासाठी न्यायालयात जरी गेले तरीपण दहा दहा वीस वर्ष न्याय मिळत नाही त्यामुळे कोणी आई वडील न्याय मागण्यासाठी समोर येत नाही हीच गोष्ट पूजा चव्हाण च्या आई-वडिलांसोबत झाली आहे त्यामुळे ते न्याय मागायला समोर आले नाही.
मोदी सरकारने न्यायव्यवस्था खिळखिळी केलेली आहे. यांच्यात मंत्रीमंडळात अनेक भ्रष्टाचारी बलात्कारी मंत्री आहेत त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
ठाकरे सरकार ने सुद्धा वेळ काढू पणाचं धोरण स्वीकारलेला आहे
त्यामुळे यांच्याकडून सुद्धा काही होईल याची आशा बाळगणे चुकीचे आहे.
सर्व महिलांना माझी विनंती आहे की आपणच या अन्यायाच्या विरोधात एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे.
जागो इंडिया जागो… जागो इंडिया जागो
आपला ध्येयवेडा भाऊ
संजय वामनराव बडवाईक
वर्धा
दिनांक 13-7-20 21.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here