शालेय विद्यार्थ्थांना शैक्षणीक फि मध्ये ५० टक्के सवलत द्या ! योगेश ढोरे, यांची मागणी !!

0
83
मातोश्री प्रतिष्ठानच्या नेतृत्वात पालक व विद्यार्थी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उतरले रत्यावर..!


बाळासाहेब नेरकर,अकोला जिल्हा प्रतिनिधी

सन २०१९ ते २०२१ या वर्षामध्ये कोवीड १९ ची महामारी संक्रमन काळात ब-याच लोकांचे रोजगार हिरावल्या गेले, काही लोक बेरोजगार झालेले होते. अशा परीस्थितीत शाळा बंद होत्या मात्र केवळ आॅनलाईन कोचींग सुरू होते. विविध शिक्षण सम्राटांनी आपआपल्या शाळांची फि मात्र पुर्ण वसुली करून पाल्यांची आर्थीक लुट करीत आहेत. पाल्यांना आपल्या मुलांची अशी भरमसाठ शालेय फी भरणे कठीण झाले आहे. अशावेळी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांना वेठीस धरुन सक्तीने फी वसुल करीत आहेत. या बाबत विविध प्रसार माध्यमांनी सुध्दा बातम्या प्रसिध्द केलेल्या आहेत ब-याच पालकांनी पोटाला चिमटा देवुन अर्धी फी भरली. पुढील फी आम्ही असमर्थ आहोत अशी विनंती केलेली आहे. कारण कोरोना महामारी मुळे व्यवसाय व कामे ठप्प असल्यामुळे आम्ही सद्या देवु शकत नाही अशी विनंती शाळा प्रशासनाला केल्या नंतरही त्या विद्यार्थ्यांचे आनलाईन क्लास बंद करुन व विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचीत ठेवल्या जात आहे. तसेच अनेक शिक्षकांना पगार दिल्या गेले नाही त्यांनी त्यांच्या विषयाचे आनलाईन क्लास बंद केले असे काही संस्था पालकांना सांगत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान केल्यानंतरही आता मात्र सक्तीची फी वसुली कडे शाळा प्रशासनाने विशेष लक्ष घातलेले आहे. विद्यार्थ्यांच्या फीमध्ये तफावत आढळत आहे. पावतीवर फि चे वर्गीकरण न करता फक्त एकुण आकडा लिहून पावती दिल्या जाते. नाव काढायचे म्हटले तर संबंधीत शाळेचे मुख्याध्यापर्क टि.सी.देण्यास नकार देतात व पालकांना हाकलुन लावतात व शाळा संस्थापकांचे व प्रशासनाचे आदेश आहेत असे सांगातात तरी मा।महोदय फी बाबत आपण काढलेला शासन आदेश रद्द करुन शैक्षणीक फीमध्ये ५०% सवलत देण्यात यावी व कोरोना काळामधील सत्र २०२०-२०२१ व शै।सत्र २०२१- २०२२ पर्यंत गरीब विद्यार्थ्यांची फी माफ करुन त्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे। तसेच पोतद्दार इंटरनशनल स्कुल, श्री समर्थ पब्लीक स्कुल, सरस्वती शिशु नर्सरी, भिकमचंद खंडेलवाल इंग्रजी प्राथ शाळा, फुलपाखरु शाळा, स्कुल ऑफ स्कॉलर इत्यादी शाळे विरुध्द तक्रारी असतांना सुध्दा शासन त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करीत नाही, सरकार व शैक्षणीक संस्थांचे काय धागेधोरे आहेत ? या करीता मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात मोठया प्रमाणात निदर्शने करुन मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला यांचे मार्फत मा.ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे.

याप्रसंगी गोपाल महाराज जोगदंड, ऍड ममताताई तिवारी, वंदनाताई इंगोले, अनिल वानखडे, मनिष गावंडे, शुभम वाकोडे, कुशल जैन, दिपक काटे, प्रमोद इंगळे, ऋतिक शिरसाट सागर श्रीवास्तव, भुषण शेळके, मुन्ना महाजन, अभिषेक वानखडे, मयुर सराफ, संदिप तवर, रणजित राजगुरु, संतोष फुलकर, सचिन लोखंडे, अमर तिवारी, अनुपम सोळंके, रवि दामोदर, राजाभाऊ शिरसाट,पंकज बाजोड, हरीश कुरवाडे,संदीप तवर, सुभाष बनसोड, ऍड श्याम बामनकर, प्रविण मानकर, हरिश बोंडे, नागेश इंगळे, अमर घुगे, अक्षय साबळे, शुभम ताले, सचिन भटकर,पियुष मानकर,नितीन वाडीकर व अकोला जिल्हयातील सर्व शाळेचे पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here