१८ जुलै / विश्वविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचास्मृतिदिन…!

0
20

सामाजिक विचार मंच वर्धा रोखठोक संजय….
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचा साहित्य अभ्यासला जाते जगविख्यात विद्यापीठांमधील
अभ्यासक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा,
कथा कादंबऱ्यांचा, पोवाड्यांचा, दलित विद्रोही साहित्याचा अभ्यास केला जातो ते भारतातील साहित्यकांचे शिरोमणी अण्णाभाऊ साठे….
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या लहानशा गावात झाला.
त्यांच्या घरची पार्श्वभूमी ही तमाशा कलावंताची होती.फक्त दीड दिवस प्राथमिक शाळेत गेले व जातीवादी व्यवस्थेने त्यांची शाळा सुटली त्यांची शाळा होती ती तमाशा. तमाशा मध्ये गाणे पोवाडे लिहिता-लिहिता कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या लहानपणापासूनच त्यांच्या विचारसरणीवर क्रांतिवीर नाना पाटील यांचा पगडा होता.
दहा वर्षाचा असतानी अण्णाभाऊ मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आल्यानंतर परळ कामगारांच्या वस्तीमध्ये लहानपण गेलं मिळेल ते काम त्यांनी केलं .वयात आल्यानंतर गिरणी कामगार झाले. 1960 मध्ये मुंबई मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला.या लढ्याचे नेतृत्व अण्णाभाऊ साठे यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने संपूर्ण महाराष्ट्र अण्णाभाऊंनी पिंजून काढला. बेळगाव ,,कारवार कर्नाटकातील मराठी भाषिकांचा प्रांत हा सुद्धा संयुक्त महाराष्ट्रा मध्ये स्वामिल व्हावा ,आंदोलन केले.
विद्रोही दलित साहित्य संमेलन मुंबईमध्ये 1958 ला झाले होते त्याचे ते अध्यक्ष होते. जवळपास 35 कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यामध्ये जगविख्यात कादंबऱ्या झालेल्या फकीरा व वारणेचा वाघ या विश्वविख्यात कादंबऱ्यांचे जगातील 27 भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. विदेशामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला विशेष मान देण्यात आला होता .रशियामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग त्या काळामध्ये होता व आजही आहे .अण्णाभाऊंच्या साहित्य मुळेच भारत व रशिया मैत्री करार त्या काळामध्ये पंडित नेहरू यामध्ये झाला. एवढ अनन्यसाधारण महत्त्व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं होतं.
विश्वविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना विश्वाने मोठं केलं पण भारताने व महाराष्ट्राने व आपल्या येथील जातीवादाने अण्णाभाऊंना लहान केले, याबाबत मला अतिशय खंत वाटते.
अण्णा भाऊ मोठे होते त्यांचं साहित्य मोठं होतं
विश्वामध्ये असा साहित्यिक पुन्हा होणे नाही…
आज अमर साहित्यिक अण्णाभाऊ साठे ,………..
.आज यांचा
स्मृतिदिन……
……. सामाजिक विकास मंच वर्धा रोखठोक संजय
कडून कोटी कोटी प्रणाम…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here