अनुप चिमकर चे घवघवीत यश-राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीसाठी पात्र !

0
17

गिरीश पळसोदकर,खामगाव तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद (NTS) दिल्ली तर्फे सन२०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर सेंट अन्स हायस्कूल खामगाव चा विद्यार्थी अनुप विजय चिमकर याची राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. सदर परीक्षा राज्य तसेच राष्ट्रीय अशा दोन स्तरांमध्ये आयोजित केली जाते. राज्य स्तरावर तो गुणवत्ता यादीमध्ये मेरिट आला होता. संपूर्ण भारतात राज्यस्तरावर दहा लाखाच्या वर विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होत असतात.त्यातून राष्ट्रीय स्तरावर केवळ आठ हजार विद्यार्थ्यांची निवड होऊन त्याच्या दुसऱ्या स्तरावर संपूर्ण भारतात केवळ दोन हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र होतात.अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत अनुप चिमकर या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने विविध स्तरातून त्याचे कौतुक होत असून अभिनंदनाचा चोहीकडून वर्षाव केला जात आहे. आपल्या या घवघवीत, देदीप्यमान यशाचे श्रेय तो शाळेचे प्राचार्य ज्ञानसुंदरी मॅडम,त्याचे शिक्षक व मार्गदर्शक विवेक दोडगे आणि त्याच्या परिवाराला देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here