लाडेगांव येथे भरदिवसा सोन्याचे दागीने व नगदीजमा रूपयांसह ५४ हजाराची चोरी ! पोलीसांनी केला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल !!

0
336

वाशिम बाळासाहेब नेरकर सह/आशिष धोंगडे

वाशिम:- कारंजा तालुक्यातील लाडेगांव येथे अमोल ज्ञानेश्वर सवाई (वय ३९) व्यवसाय शेती रा. लाडेगाव यांच्या घरामध्ये दुपारच्या सुमारामध्ये घर फोडून चोरी करण्यात आली. यामध्ये फिर्यादीच्या तक्रारी नुसार १० ग्रॅमची सोन्याची पोत व ३५०० रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेल्या सांगण्यात आले. दि. १८ जुलै २०२१ ला दुपारी १ वाजता सुमारामध्ये ही घटना घडली आहे.

पोलीस विभागाचे श्वानपथक व तज्ञ आॅफीसर चोरीचा कसुन शोध घेतांना दिसुन येत आहेत.

या बाबत हकीकत अशी आहे कि, धनज बु पोलीस स्टेशन येथे अमोल ज्ञानेश्वर सवाई समक्ष पोलीस स्टेशनला येऊन जबानी रिपोर्ट देण्यात आला. सकाळी सहा वाजताच्या सुमारा मध्ये अमोल व त्यांची पत्नी शेतीच्या कामाकरिता गेले असल्यामुळे दुपारी १ वाजता सुमारास मध्ये ही घटना घडली आहे. घरी येताच अमोल त्याच्या पत्नीला लाईट फिटिंग साठी पैसे मागितले तर माझ्या पत्नीने मुगाच्या डबीचे डब्यात ठेवलेले ३,५०० रुपये घेण्यास डबा उघडला.तर त्या डब्यांमध्ये ठेवलेली नगदी रक्कम ३,५०० व 10 ग्रॅम सोन्याची पोत किंमत 50.000 रुपये असे डब्यामध्ये दिसले नाही. डब्यामध्ये ठेवलेली सोन्याची पोत १० ग्रॅम किंमत ५० हजार रुपये चांदीचे जोडवे १ हजार रुपये नगदी ३ हजार ५०० रुपये असा एकूण ५४,000 रुपये किमतीचा माल चोरून नेला.

अशा फिर्यादीच्या वरून धनज पोलीस स्टेशन येथे कलम ३८० दाखल करून धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्वानपथक आणि फिंगरप्रिंट एक्सपोर्ट च्या सहाय्याने पुढील तपासाकरिता बीट जमदार रामचवरे मेजर व सहाय्यक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here