स्टॅम्प पेपर रास्त भावात मिळत नाही ! काळाबाजार करणार्‍यांवर पुढारी, अधिकारी लक्ष देईल काय कुणी !!

0
33

गिरीश पळसोदकर,खामगाव- तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून 150-200 रूपये ज्यादा दराने विक्री होत आहे. एव्हढेच नव्हेतर स्टॅम्प विक्रेते आपल्या दुकानातच झेरॉक्स काढण्याची व टायपिंगचे दस्तावेज बनविण्याची सक्ती करीत असल्याची बाब समोर आली आहे, या माध्यमातून परवानाधारक मुद्रांक विक्रेते गोरगरिबांची लूट करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत, या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी तर सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाशी निगडित कामकाजा संबंधी 100 रूपयांच्या स्टॅम्पची गरज भासत आहे. मात्र आवश्यक कोर्ट फी स्टॅम्प व पेपर उपलब्ध होत नाहीत. स्टॅम्प वेंडरकडे गेल्यास स्टॅम्प पेपर नसल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यांच्या दुकानातूनच टायपिंगची कामे केल्यास स्टॅम्प पेपर सहज उपलब्ध होतो. अन्यथा अव्वाचे सव्वा पैसे मोजावे लागतात. बँकेशी संबंधित कामासाठी शेतकऱ्यांना 3-3 कोरे स्टॅम्प पेपर आणण्यास सांगण्यात येते. अशावेळी संबंधित शेतकऱ्याची व्दिधा मनस्थिती निर्माण होवून त्याला ज्यादा दराने स्टॅम्प विकत घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. यासंदर्भात दाद मागावी तर कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला पडत असून संबंधित अधिकाऱ्यांनी परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here