
सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०७
चंद्रोदय : ११:३० चंद्रास्त : २३:२२
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – ११:५० पर्यंत
नक्षत्र : चित्रा – ०६:५६ पर्यंत
क्षय नक्षत्र : स्वाती – ०५:४४, ऑगस्ट १५ पर्यंत
योग ; शुभ – ११:१३ पर्यंत
करण : तैतिल – ११:५० पर्यंत
द्वितीय करण : गर – २२:५२ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि ; तूळ
राहुकाल : ०९:३१ ते ११:०७
गुलिक काल : ०६:१९ ते ०७:५५
यमगण्ड ; १४:१९ ते १५:५५
अभिजितमुहूर्त : १२:१७ ते १३:०९
दुर्मुहूर्त : ०६:१९ ते ०७:१०
दुर्मुहूर्त : ०७:१० ते ०८:०२
अमृत काल : २१:२३ ते २२:५४
वर्ज्य ; १२:१५ ते १३:४७
१५ ऑगस्ट , १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ते खंडित स्वरूपाचे आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देवतास्वरूप मातृभूमीचे विभाजन झाले.
१९४७ मध्ये झालेली भारत- पाकिस्तान फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या राजांनी, शक्तींनी मागील २५०० वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, म्यानमार , श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख इतिहासातील कुठल्याच ग्रंथात नाही. त्यामुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टी मिळते.
“ गेल्या शे-दोनशे वर्षांपूर्वीपासून ते आत्तापर्यंत अखंड भारताचे तुकडे होऊन (काही मुद्दाम करून) आत्ता आपल्याला / आपल्या मुलांना, नवीन पिढीला खंडित भारताचा नकाशा दाखवला जातो. पण अखंड भारत कसा होता ? हे आजच्या पिढीला (आणि पुढील प्रत्येक पिढीला) समजावून सांगणे गरजेचे आहे.
भारत देश पुनः अखंडित करण्याचा संकल्प प्रत्येकाने सोडणे ही काळाची गरज आहे. परत एकदा आपण अखंड भारताचा संकल्प करूया व तो “ संकल्पच आपल्याला यशाचा मार्ग दाखवेल.”
दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतात (आणि विदेशातही) प्रत्येक शहरात, गावोगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे असा संकल्प करण्याचे अनेक कार्यक्रम होत असतात. आपण प्रत्येकाने सहकुटुंब, आपल्या जवळच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ‘अखंड भारता’चा संकल्प संकल्प करूया..
तेरावैभवअमररहे माँ हमदिनचाररहेन_रहे

रा.स्व. संघाचे – ज्येष्ठय प्रचारक हो. वे. शेषाद्रीजी –
बेंगलोरच्या विश्वविद्यालयातून M.Sc.रसायन शास्त्र ( सुवर्णपदक ) पदवीधर झाल्यांनतर सन १९४६ पासून रा.स्व. संघ कार्याला प्रचारक म्हणून कर्नाटक राज्यातून सुरवात केली.
विविध जबाबदाऱ्या घेतल्यानंतर १९८७ पासून संघाचे सरकार्यवाह ही जबाबदारी त्यांचे कडे आली. विपुल लेखन, साप्ताहिक तसेच मासिकांचे संपादन विभाग सुद्धा त्यांनी सांभाळला. अनेक विषयांवर त्यांनी पुस्तक लेखन केले.त्यात फाळणीची शोकांतिका, काश्मीर समस्यांबद्दल काश्मीर एक धुमसते बर्फ, चिन्तन गंगा, युगावतार (छत्रपती शिवाजी महाराजांवर ), अम्म बगिलू तेगे (निबन्ध), भुगीलू (आपातकाल पर). ही विशेष पुस्तके आहेत. तसेच ‘विक्रम’, ‘उत्थान’, ‘आर्गनाइजर’ व पाञ्चजन्य ह्यामधून सुद्धा विपुल लेखन केलेले आहे. १९८२ मध्ये त्यांना “तारबेरालू ” ह्या ग्रंथ लेखनाबद्दल कर्नाटक साहित्य अकादमीने सन्मानित केले.
•२००५ : रा.स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक सरकार्यवाह, होन्गासान्द्रा वेण्कटरमइया शेषाद्री ( हो. वे. शेषाद्री ) यांचे निधन.
पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर : ह्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते. बी.ए. एल्.एल.बी. झालेल्या गोदावरीबाईं कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

१९३९ मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद साहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात मोलाची भूमिका पार पाडली.
गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास त्यांनी चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी त्यांची ११ मोफत ग्रंथालये व १० मोफत वाचनालये मोफत चालू होती.
१९४५च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, `जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली. ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या समाजशास्त्रीय ग्रंथातून त्यांनी जमीनदारांकडे पिढयानपिढया वेठबिगारीने काम करणाऱ्या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे.
आदिवासी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिल्यावर हा माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे.यातील ‘वेठबिगारी गाडून टाकली’ या प्रकरणातून आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात नवचैतन्य कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे. याखेरीज त्यांनी आर्थर रोड, ठाणे, दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या गुन्हेगारावर ‘बंदिवासाची आठ वर्ष’ हे पुस्तक लिहिलेले आहे.
१९०७: महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)
- घटना :
१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.
१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
२०१०: पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
• मृत्यू :
१९८४ : भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक – पहिले वैयक्तिक पदक मिळवणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन ( जन्म : १५ जानेवारी, १९२६ )
२०११ : हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचे निधन ( जन्म : २१ ऑक्टोबर, १९३१ )
•२०१२: महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे ,१९४५)
- जन्म :
१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.
१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर, १९९४)
१९५७: विनोदी अभिनेतते जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.
आपला दिवस मंगलमय जावो
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्