कुठपर्यंत कराल सुशिक्षितांची वेठबिगारी ? योग्य निर्णय घ्या ! व अंमलात आणा !!

0
66

जय जिजाऊ

मेहनतीला पर्याय नाही . काही तरी उद्यम -उपक्रम – दिनचर्या -तपश्चर्या , भूतकाळाचे अपकार -उपकार सह मागोवा , वर्तमानाचे भान व सादरी करण, तसेच भविष्याचा कल पाहता . तशी तजवीज करणे – करीत राहणे . या सर्व गोष्टीचे तारतम ठेवून असणे ; म्हणजे मेहनत करणे असे म्हणता येईल !

एकेकाळी भारतीय जीवन म्हणजे येथील मुख्य उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच होते . प्राधान्य क्रमाने शेती व शेतकरी परिवार . नंतर दुसऱ्या स्थानी व्यवसाय – व्यापार – उद्योगी परिवार व शेवटच्या तिसरा क्रम नोकरी व विविध प्रतिष्ठानांवर कुशल कारागीर तसेच अकुशल हरकाम्या चाकरी , सोबत शेतावर जाऊन उचित मोबदल्यात राबणारे -काम करणारे कामदार – मजूर वर्ग . असे त्या विशिष्ट गत काळी राहत होते . अगदी ठरल्या प्रमाणे की काय , पण त्या काळी जीवनयापण चे हे तीन वर्ग अगदी चाकोरी बद्ध जीवन सुखाने- आनंदाने जगत होती .

भूतकाळाला धन्यवाद देत वर्तमानातील सुखकर जीवन जगत भविष्यातील प्रगतीच्या व बेरजेच्या क्रमाने नक्कीच प्रगतीच्या वाटेवर राहात होती . परंतु गत वीस-पंचवीस वर्षां पासून मात्र या सर्व जीवनशैली वावटळीत गुरफटल्या गत पार ठाव -ठिकाणा हरवल्या गत झाल्या आहेत . या चालू वीस पंचवीस वर्षातील शैक्षणिक गुणवत्ते नुसार उच्चपदस्थ नोकर्‍या मिळविणे , तसेच अनियमित निसर्ग व परिवारांचे गृह विलगीकरण या मुळे शेती करणे परवडीनाशि झाली आहे . तेव्हा हमखास व सुरक्षित जीवन म्हणून शासकीय-निमशासकीय ठिकाणावर नोकरी करणे . हा एक पायंडा पडला आहे . सुरुवाती सुरुवातीला अगदी योग्य गुणवत्ते नुसार व सर्वांना याचे महत्त्व न समजल्या मुळे या क्षेत्रात फारशी स्पर्धा नव्हती . अगदी सहज सरळ मार्गाने नोकऱ्या मिळत होत्या . परंतु जसजसे हे नोकरवर्ग त्यांचे जीवन अगदी शाही जीवन जगत आहेत .हे जसे सर्वांच्या लक्षात यायला लागले . तर तसे या कडे सर्वांचाच कल वाढू लागला . या मुळे सरकारी काही जागां साठी शेकडो हजारोंच्या संख्येने नोकरी साठी इच्छुक उमेदवारांची संख्या यायला लागली .

शेतकरी परिवारातील हिसे वाटणी मुळे शेतीचे क्षेत्र घटणे व शेती विकवण्या करिता घरातील सदस्य संख्या कमी होत जाणे . या सोबत निसर्गाचा अत्यंत लहरीपणा , तसेच सदस्य संख्या कमी पडल्या मुळे मजूर लावून शेती करणे परवडेनाशी झाली . दिवसें-दिवस तिच्या पासून काढता पाय घेणार्‍यांची संख्या वाढू लागली . मग हमखास उत्पन्नाची हमी म्हणून व्यवसाया ऐवजी नोकरी कडे पाहिल्या जाऊ लागले .

‘आटा कम फकीर जादा ‘, असे शासकीय नोकऱ्यांच्या बाबत होऊ लागले . मागणीचा सिद्धांता नुसार इथे सुद्धा तेच वाणिज्य व्याख्ये नुसार झाले . नोकर्‍या कमी , मागणारे जास्त ! तेव्हा सरळ सहज उपलब्ध असणारे हे क्षेत्र लेन -देन च्या फेर्‍यात आले . आज तर इतके निर्ढावले की , अगदी लाखो रुपयांची मागणी केल्या जात आहे . हे लाखो रुपये देण्या साठी शेतकरी त्यांची मिळकत , सोनं-नाणं व प्रसंगी स्थावर-जंगम विकून सुद्धा त्यांच्या घरातील त्या उच्चशिक्षित सदस्यास एकदाचे आटापिटा करून नोकरी मिळवून देण्यात गर्त आहेत .

एकदा नोकरी मिळाली की , तो गलेलठ्ठ पगार मिळणार व आपल्या पुढच्या पिढ्या सुखाने व उच्चश्रेणी जीवन जगणार ! हे भविष्यातील गोड स्वप्न पहात ; यांची ही खटपट झालेली आढळते . परंतु जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे काही वेगळेच वाढलेले ताट समोर येत आहे . असा प्रत्येक वेळेचा अनुभव येतो .
उदा . दाखल – समजा शेतकरी त्याचे घरातील सदस्या साठी एनकेन प्रकारे जमा पुंजी व विकटीक करून डोनेशन देतो . नोकरी मिळवतो .पण पुढे त्या सदस्याला त्याचे बदललेले चकाकी चे जीवन जगण्या करिता , तो ज्या लोकां सोबत वावरतो – नोकरी करतो . त्यांची बरोबरी म्हणून त्यांच्या सारखे महागडे जीवन जगायला लागतो . या अगोदर अगदी साधे राहणीमानातील , साध्या घरातील , सरळ पायी चालून कामे करणारा हा जीव हे सर्व सोडून चमकधमक च्या दुनियेत प्रवेश करतो . बंगला- गाडी – दुचाकी वाहने ; नेहमी महागडी पेहरावांची शर्यत म्हणजे बूट-सुटा सहित यांना बदलणे किंवा बदल करणे क्रमप्राप्त होऊन जाते . हे सर्व करीत असताना यांची मुले मोठी व्हायला लागतात . आज मितीला तर इंग्लिश कॉन्व्हेंट या गोड पण फसव्या नावा खाली भरपूर मोठ्या रकमेचे डोनेशन अगदी KG- 1 पासूनच भरणे सुरु करावे लागते . अगदी लाखो रुपये यांच्या पाल्यांच्या शिक्षणा करिता यांचे कमाईतील भाग निघून जातो . पुढे उच्च शिक्षण तर आता अगदी १ -२ करोड रुपयात विकत घ्यावी लागत आहेत .

या सर्व काटेरी रस्त्यां वरून चालताना या चाकरमान्यांची मान पूर्ण लुळी पडल्यागत झालेली असतानाच ; संकट अजूनही संपलेलं नाही बरं ! या त्यांच्या उच्चशिक्षित पाल्यास पुन्हा तेच , जे यांना यांच्या नोकरीच्या वेळेस पैसे भरावे लागले होते . ते काळ पुढे गेलेला असतो . या वेळी तर मागच्या वेळी पेक्षा सुद्धा जास्त लोकसंख्या नोकरी मागण्या करिता मैदानात उतरलेली असते . तेव्हा सहाजिकच टक्कर -लढत काट्याची असते . संबंधित नोकरी देणारांचे लांगुलचालन करावे लागते . हे सर्व मानसिक आघात सहन करून , वरून भरपूर भरपूर रक्कम डोनेशन म्हणून , काही ठरलेली तर काही टेबला खालून देणे भाग पडते ! कारण असे नाही केले तर त्या उच्चशिक्षित पाल्याचे जीवन जगणेच संपल्यात जमा होऊ शकते . .याला कारण त्यांच्या पालकांनी त्या पाल्यांना जे शिकवलेले असते . ते त्यांच्यातील कला – कसब -व्यवहार चातुर्य – चारचौघात स्नेह तयार होईल – ओळख होईल असे शिकवलेले नसते . तर ते शिक्षण फक्त आजच्या नकली चमकचे नवीन शिकार – गुलाम बनवण्याचे असते . आणि अशा प्रकारे अगोदर लुडी पडलेली मान शेवटी कंबरड ही मोडते !

अशा या मेंढीपळण विश्वातील सुशिक्षित रोजगार (पगार ) कमावणारा कसा या चमकधमक च्या दुनियेत- चक्रव्युवहात गुंडाळला जातो . ते ऐकूनच वरील वाचनातून लक्षात येईल . म्हणजे जमा -पुंजी , काही सोनं मोडतोड , स्थावर-जंगम विकून नोकरीवर लागणे . पुढे कर्जा वरच घर बांधणे . गाड्या घेणे . मुलांचे शिक्षण करणे . परत चार-चौघांत पुढे लाचार होऊन पुन्हा पैशाची जमवा-जमव , कर्ज काढून त्यांना नोकरीवर लावणे . हे सर्व खरंच हे लोक प्रसन्न मनाने -राजी खुशी करीत असतील काय ?! नक्कीच नाही ! जीवन जगण्या करिता करावे लागणारे प्रयत्न मजबुरीने व जिवावर येऊन करावे लागल्यास ; त्याला वेठबिगारी असेच म्हटल्या जाते .

पूर्वी काहीच चतुर-धूर्त लोक इतर साध्या-सरळ कुठलाही आचपेच – डावपेच माहीत नसलेल्या देवभोळ्या ‘ अशिक्षित लोकांच्या बुद्धीचा भेद करून ; त्यांना व्यवहारात ठगवून त्यांचे कडून ढोर मेहनत करून घेत असत . शेवटी मोबदला मात्र फक्त तो खाऊन पिऊन जिवंत राहील , इतकाच त्याचे पदरी टाकत असत ! आज भलेही शिक्षीतांचा भरणा वाढला आहे . पण म्हणून ते सुशिक्षित अजुनही ठरत नाहीत . हेच इथे विशेषत्वाने दिसून येत आहे ! हे शिक्षित सुद्धा अगदी यातील ९० टक्के लोक जीवनाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा फक्त खाण्या-पिण्या पुरतेच जीवन जगण्याच्या कक्षेत आलेले आढळत आहेत . यांची स्थावर-जंगम सुद्धा यांच्या हक्काची , पूर्ण हक्काची असत नाही . कारण सोसायटी नियमा प्रमाणे पैसे भरून मालकी हक्काची यांची घरे-फ्लॅट हे सुद्धा यांना भाडोत्री सारख्या नियमाने वापरावी लागतात . मग यांच्या इतर सर्व जीवनाची कल्पनाच केलेली बरी !! म्हणुनचं म्हणतोय की ……

कुठपर्यंत कराल सुशिक्षितांची वेठबिगारी ? योग्य निर्णय घ्या ! व अंमलात आणा !!

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here