
सूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:११
चंद्रोदय : १८:४८ चंद्रास्त : ०७:००
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – २२:१५ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – १६:१७ पर्यंत
योग : वज्र – २१:०१ पर्यंत
करण : बालव – ०९:१७ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २२:१५ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १३:५० ते १५:१७
गुलिक काल : ०९:२९ ते १०:५६
यमगण्ड : ०६:३४ ते ०८:०२
अभिजितमुहूर्त : १२:०० ते १२:४६
दुर्मुहूर्त : १०:२७ ते ११:१३
दुर्मुहूर्त : १५:०६ ते १५:५२
अमृत काल : ०८:२५ ते १०:१०
वर्ज्य : ११:५५ ते १३:४०
वर्ज्य : ०२:५७, ऑक्टोबर २२ ते ०४:४३, ऑक्टोबर २२
अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
अशा कर्तव्य निष्ठ शहिदांना विनम्र अभिवादन
आज भारतीय पोलीस स्मृती दिन आहे
डॉ. द.रा. बेंद्रे – त्यांनी १९१४ ते १९१८ या काळात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतली. १९१६ साली बेंद्रे वीस वर्षांचे झाले या काळात त्यांची कविप्रतिभा कन्नड, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांतून चौफेर वाहू लागली.
१९१६ मध्ये बेंद्रे यांनी फर्ग्युसन कॉलेजात असताना मुरली नावाचे हस्तलिखित कन्नड-मराठी मित्रांच्या मदतीने दोन्ही भाषांत प्रसिद्ध केले. ही त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात मानली जाते.
१९१८ मध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन बेंद्रे बी.ए. झाले. तसेच एम.ए. झाल्यांनतर १९४४ ते १९५६ अशी बारा वर्षे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात कानडीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.
पुण्यात असताना बेंद्रे यांच्या पुढाकाराने १९१५ साली रविकिरण मंडल व शारदा मंडळ या नावाने मित्रमंडळांची स्थापना झाली.
पुढे धारवाडला आल्यावर बेंद्रे यांनी तेथेही ’गेळेवर गुंपू’ची म्हणजे मित्र मंडळाची स्थापना केली. कन्नड साहित्यामध्ये या मंडळाला आजही मानाचे स्थान आहे.
इ.स. १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. अमृतानुभव, व चांगदेव पासष्टी यांचे कानडी भाषेत अनुवाद केले. मराठी लोकांना आधुनिक कन्नड काव्य, आणि विनोद यांचा परिचय करून दिला.
त्यांना भारत सरकारने इ.स. १९६८ पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि इ.स. १९७४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केले
• १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी१८९६ – धारवाड, कर्नाटक)
धर्मभास्कर – गंगाधर नारायण कोपरकर यांचा जन्म भिवंडी येथे झाला. आत्यंतिक गरिबी. पण पुढे शिकण्याची जबरदस्त इच्छा होती. ७ वी झाल्यानंतर ते पुण्यात आले. ते एक नामवंत गायक होण्यासाठी. पुण्याच्या पत्र्यामारूतीच्या मंदिरात राहून १० घरी माधुकरी मागून त्यांनी गांधर्व महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पण त्यांच्याकडे फीचेही पैसे नव्हते म्हणून शेण आणून महाविद्यालयातील जमीन दर आठ दिवसाला सारवून फी चे ३ रु. महिना त्यांनी भरून दिले.
संगीत विशारदपर्यंत संगीताचे शिक्षण घेऊन ख्याल गायकीपर्यंत संगीतविद्या आत्मसात केली. नंतर प्रसिद्ध कीर्तनकार भिलवडीकर शास्त्री यांच्या घरी राहून कीर्तन, संस्कृत व वेदांत तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. तसेच हरि कीर्तनोत्तेजक पाठशाळा येथेही कीर्तनाचे शिक्षण घेऊन कीर्तनाचा सखोल अभ्यास करून ‘कीर्तनशलाका’ ही पदवी प्राप्त करून ते प्रसिद्ध कीर्तनकार बनले. आजपर्यंतच्या क्षणापर्यंत ‘कीर्तनशलाका’ ही पदवी मिळविणारे ते एकमेव कीर्तनकार आहेत.
याच कालावधीत त्यांनी एक वर्षात ३ इंग्रजी इयत्ता करुन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करुन बी.ए. ऑनर्सपर्यंत महाविद्यालयाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्रपंच चालविण्यासाठी गुजराथी हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यासाठी त्यांनी संस्कृतची ‘काव्यतीर्थ’ ही परीक्षा दिली. या गुजराथी हायस्कूलमध्ये नोकरी करतानाच गुजराथी भाषा आत्मसात केली. नोकरी सोडताना त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत व गुजराथी भाषा बोलता येत होत्या.
कीर्तनाद्वारा प्रचारकार्य चालू असतानाच त्यांनी कीर्तनकारांची संघटना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी पहिले कीर्तनसंमेलन गोवा राज्यात १९७६ मध्ये झाले. तिथेच कीर्तन महाविद्यालयाची घोषणा झाली व १९७७ पुण्यात कीर्तन महाविद्यालय सुरु झाले.
याच उपक्रमाबरोबर परदेशात कीर्तनकार पाठविण्याची योजना आखून १२ कीर्तनकार परदेशी पाठवून अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका देशात कीर्तनाद्वारा धर्मपताका फडकाविली. हा एक नवीन विक्रम करताना कीर्तनकारांना हिंदी, इंग्रजी, गुजराथीमधून कीर्तने तयार करुन कीर्तने त्यांनी बसवून घेतली.
कीर्तनकार कसा असावा याविषयी त्यांची काही मते होती. कीर्तनकार पदवीधर असावा, त्याला कमीत कमी संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषा यायलाच पाहिजेत व या भाषेतील वचनांचा त्यांनी मराठी बरोबर उपयोग करावा. पाश्चात्यांचे दाखले दिल्याने, आपले बोलणे वजनदार होते.
कीर्तनकलेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी सरकार दरबारी मानन्मान मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यशासनाचा पुरस्कार पहिला पुरस्कार धर्मभास्कर कोपरकरांनाच मिळाला.
कीर्तनकारांना स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून कीर्तनकला व तिचे महत्त्व शासनाला पटवून देऊन आज वृद्ध कीर्तनकारांना कलाकार पेन्शन मिळू लागले आहे.
१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१ )
- घटना :
१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
१९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
• मृत्यू :
• १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च, १७७५)
• १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे, १९२१)
• २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
- जन्म :
१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी, १९६१)
१९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर, २००२)
आपला दिवस मंगलमय जावो
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्
