इंग्लंड विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा जुगार खेळविणार्‍या सटोरीयावर विषेश पोलीस पथकाचा छापा ! विविध मोबाईल सह १ लाख ४ हजार,३०० रु. चा मुद्देमाल जप्त !!

0
52

बाळासाहेब नेरकर, अकोला जिल्हा प्रतिनिधी

दि. २६ आक्टोंबर रोजी शहरात पेट्रोलिंग करीत असताना खात्रीलायक बातमी मिळाली कि सुमित दिलीप गुरबानी वय २१ रा. सिंधी कॅम्प पक्की खोली अकोला हा आपल्या सुखकर्ता किराना दुकान , चिवडा बाजार जवळ येथे इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट सामन्यावर पैश्याच्या हारजीतचा जुगार खेळवित आहे अशी खबर प्राप्त झाल्यावर पोलीसांनी सदर ठिकाणी रेड केला असता त्या ठिकाणी सदर इसम इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट वर पैस्याचा हारजीत जुगार खेळताना मिळाला..तसेच तेथे सॅमसंग कंपनी चा टिव्ही, सेट टॉप बॉक्स रिमोट सह, आणि विविध कम्पनी चे ५ मोबाईल फोन,किंमत ८५,000 रुपये व नगदी ८000रुपये असा एकूण १ लाख ४ हजार ३०० चा मुद्देमाल मिळून आला..तसेच त्याने अक्षय उर्फ गोलू शर्मा आणि मुकेश उर्फ पिंकल जिवतानी हे क्रिकेट जुगार खेलविणे करिता साठी ग्राहक आणन्यास मदत करतात व आर्थिक सहयोग असे सुमित गुरबानी याने सांगितले…त्यांचे हे कृत्य महा. जुगार. कायदा अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन कोतवाली अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे वारिल 3 आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे .

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक .. जी श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here