श्री गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती द्वारा जाहीर आवाहन !

0
28

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील सत्र 2021-22 मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 10 टक्के अतिरिक्त प्रवेशास विद्यापीठाकडून मान्यता प्रदान करण्यात येते. याबाबत ज्या महाविद्यालयांना 10 टक्के अतिरिक्त प्रवेशास मान्यता प्रदान करण्यात आली किंवा मान्यता देण्यात येईल, अशा सर्व महाविद्यालयांनी अतिरिक्त प्रवेश फक्त गुणवत्तेनुसारच करावे, असे आदेश कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी दिले आहेत. कुलगुरूंनी दिलेल्या आदेशाचे पालन सर्व महाविद्यालयांनी करावे व याबाबत कोणतीही तक्रार विद्यापीठाकडे येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्राद्वारे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविले आहे. तरी सर्व संबंधित विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here