घनोकार परीवाराने आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ पुंडलिक महाराज महाविद्यालया ला दिली २२ हजार रूपये किंमतीची स्पर्धा परीक्षेची ६० पुस्तके दान !

0
124

नांदुरा : रोषण आगरकर, ऊपसंपादक जगदिश न्युज

रविवार दि .२८-११-२०२१ रोजी क्रांती पुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मृतिदिना निमित्त नांदुरा येथे , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती द्वारा संचालित , श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयाला स्पर्धा परीक्षेची ६० पुस्तके , २२०००/- रुपये मूल्य असलेली दान दिली . तेव्हा दान देण्याचे औचित्य म्हणजे महात्मा फुले यांचा स्मृतिदिन ; व घनोकार बंधुंच्या मातोश्री स्वर्गीय अहिल्याबाई सितारामजी घनोकार यांचे कोरोना काळात कोरोना मुळे दि. १०/५/२०२१ रोजी झालेले दुखदायक निधन झालेले होते.त्यांच्या स्मृती निरंतर स्मरणात रहाव्या असा मनोदय मनोमन व्यक्त केलेला होता. परंतु त्यावेळी संपुर्ण नांदुरा शहरात लाॅकडाऊन असल्यामुळे शाळा महाविद्यालये बंद होती.

,,मरावे परी किर्ती रूपाने ऊरावे ! या पारंपारिक म्हणीनुसार जुण्या चालीरितीमध्ये गुंतुन न रहाता , तेरवी न करता समाजाचे कल्याणा करिता उपयोगात यावे ! व सोबतच मातृ-पितृ ऋणातून उतराई व्हावे म्हणून , हा स्पर्धा परीक्षेचे पुस्तके दान देण्याचा मनोदय व्यक्त केलेला होता. त्या मनोकामनेची पुर्तता घनोकार परिवार नांदुरा / बेलुरा यांनी महाविद्यालयी विद्यार्थाना अभ्यासाचे ऊपयोगात येतील अशा पुस्तकांचा ठेवा ग्रंथालयाला ऊपलब्ध करून दिला.
या वेळी घनोकार परिवार नांदुरा /बेलुरा तथा नातेवाईक अंभोरे , झोळे , सोनोने , भारंबे , माळी , मानकर , पारस्कर , वनारे , सदाबल , घाईट सर्व परिवार उपस्थित होते . जवळ जवळ ३५-४० नाते संबंधी सह , एस पी एम कॉलेज च्या प्राचार्य सौ मानकर मॅडम श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री मानकर सर तसेच कॉलेज स्टाफ पैकी एकनाथराव अवचार सर , ग्रंथपाल अत्राम मॅडम , ऊले सर , साबळे सर , गावंडे सर , लाहुडकार सर , परेशजी जवंजाळ , गजाननजी डांगे इत्यादींनी उपस्थिती दिली .

या छोटेखानी घरगुती वातावरणातील कॉलजातील कार्यक्रमाचे समायोचीत अर्थपूर्ण विशेषतः नेमक्या शब्दात भावनीक संचलन घनोकार परिवारातील नांदुरा न . प . पाणी पुरवठा सभापती अजयजी घनोकार यांनी केले . तसेच प्राचार्या सौ मानकर मॅडम यांनी या पारंपारीक तेरवी न करिता , पुस्तके दानाचे महत्व सांगत , कार्यास अनुसरून मनोगत व्यक्त केले व श्री उले सर यांनी आभार व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here