
शब्द संकलन : विजयकुमार ऊर्फ बिट्टुभाई वर्मा, प्रतिनिधी सेव्हन स्टार न्युज, मलकापुर
रोख ठोक.. निर्भिड मत..मांडणार्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलचा वेध भविष्याचा उडान विशेषांकाचे प्रकाशन सोहळा,पुसेसावळी येथे थाटात संपन्न झाला. सेव्हन स्टार न्युज चॅनलच्या उडान या देखण्या व दिमाखदार अशा विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन,मा श्री संजय येवले साहेब याच्या विठ्ठल कॉम्प्लेक्स येथे सेव्हन स्टार न्युज चॅनलचे पुसेसावळी विभागाचे प्रतिनिधी नितीन कुलकर्णी यांच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमासाठी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, मायणी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे,वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम, सेव्हन स्टार न्युज चॅनलचे संपादक विनायक पवार सर,माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दादा पवार, पंचायत समिती सभापती जयश्रीताई कदम, पंचायत समिती सभापती रेखाताई घार्गे, युवा नेते प्रकाश घार्गे, सहायक पोलिस निरीक्षक औंध प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक पुसेसावळी गंगाप्रसाद केंद्रे, जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, गोरेगाव वांगीचे वेताळ भक्त दादा महाराज,यांच्या उपस्थितीत सेव्हन स्टार न्युज चॅनलच्या वेध भविष्याचा उडान विशेषांकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न झाला, यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन, दिपप्रज्वलन करण्यात आले.व उपस्थित मान्यवरांचा परिचय व त्यांचे स्वागत सेव्हन स्टार न्युज चॅनलचे पत्रकार नितीन कुलकर्णी यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेव्हन स्टार न्युज चॅनलच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढीत त्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून त्यांनी काढलेल्या उडान या विशेषांकाचे भरभरुन कौतुक केले.
तर सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचे संपादक विनायक पवार यांनी न्युज चॅनलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देवून केवळ न्युज चॅनेल चालविणे एवढाच आमचा उद्देश नसून या माध्यमातून समाज जागृती बरोबरच समाजातील अनिष्ठ बाबींना जनतेसमोर आणण्याचे काम आमची टिम नेहमीच करीत असल्याचे सांगितले . त्याचप्रमाणे सेव्हन स्टार न्यूज चॅनेलची ध्येयधोरणे तसेच राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देवून कोरोना काळातही चॅनेलच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत मदतीसाठी पोहचण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले . पुसेसावळी परिसरासह, खटाव तालुक्यात नितीन कुलकर्णी यांच्या माध्यमातून सेव्हन स्टार न्युज चॅनेल आता प्रत्येकापर्यंत पोहचले असून ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवरही शाबासकीची थाप दिली . तर यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांनी सेव्हन स्टार न्युज चॅनेलचे २०१६ साली लावलेले रोपटे आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारले असून ते संपूर्ण भारतभर विस्तारण्यासाठी शुभेच्छा दिल्या . वर्धन ॲग्रोचे चेअरमन धैर्यशील दादा कदम ,माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दादा पवार, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज,पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सुहास दादा पिसाळ यांनी आपली मनोगत व्यक्त करताना सेव्हन स्टार न्युज चॅनलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी या निमसोडचे युवा नेते मोहनराव देशमुख,माजी सरपंच सुरेश बापु पाटील, सरपंच दत्तात्रय रुद्रूके,माजी पोलीस निरीक्षक एम.पी.माने,वर्धन ॲग्रो कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम,उदयभाऊ गुरव, युवा नेते सचिन घाडगे,युवा नेते महेश पाटील, सुधीर पवार,सतिश थोरात, सुदर्शन मिठारे,भाजप युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सरपंच कृष्णत पिसाळ, अनिल पिसाळ, सुधाकर कुंभार, वसंत पिसाळ,कार्यक्रमाला राजकीय , सामाजिक , क्षेत्रातील पदाधिकारी,पुसेसावळी भागातील उद्योजक, तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साबळे सर यांनी केले,प्रास्तविक नितीन कुलकर्णी तर आभार प्रदर्शन रमेश जाधव सर यांनी केले .