विश्व हिंदू परिषद, गोरक्षा विभाग, विदर्भ प्रांत, द्वारा “गौ आधारित कृषी तंत्रज्ञान” प्रशिक्षण शिबीर संपन्न !

0
33

गिरीश पळसोदकर,जगदिश न्युज खामगाव प्रतिनिधी

स्थानीय सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्था, जलम्ब येथे दिनांक २७ व २८ नोव्हेंबर ला गोवंश आधारित कृषी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिवीरात गांडूळ खत, नॅडेप कंपोस्ट खत , जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, कीटनियंत्रक, अमृतकवच , पंचगव्य बीज प्रक्रिया, बुरशीनियंत्रक , बुरशीनाशक, अमृतपानी, सोयाबीन टॉनिक, बायोडायनॅमिक कंपोस्ट, तरल खत, शेती चे कृषीतंत्र, एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक किट व्यवस्थापन, पंचांगानुसार पेरणी, गोवंशाची देखभाल, गोकृपा अमृतमं (कल्चर व बॅक्टेरिया) गौ कृपा/कृषिपद्धती- युरिया, डी. ए. पी., पेस्टीसाईड, आदी विषयावर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह गौरक्षा प्रमुख दिवाकर नेरकर यांनी मार्गदर्शन केले. अमरावती, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातून सेंद्रिय शेती करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाचे संचलन संस्थेचे सदस्य श्री गणेश मोहळे, यांनी तर अध्यक्षीय उद्बोधन विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेज चे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर संदीप फाले यांनी तर आभार प्रदर्शन सचिव उद्धव नेरकर यांनी केले. प्रशिक्षणार्थी पैकी सचिन ठाकरे, धनश्री बंड, प्रमोद कुलकर्णी यांनी शिवीराबद्दल अनुभव कथन करून भविष्यात सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here