🕉 || सुप्रभात ||आजचे पंचांग (मंगळवार, डिसेंबर ७, २०२१) युगाब्द : ५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अग्रहायण (मार्गशीर्ष) १६ शके १९४३सूर्योदय : ०६:५९ सूर्यास्त : १८:०१

0
54

चंद्रोदय : १०:०५ चंद्रास्त : २१:२०
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – २३:४० पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – ००:१२, डिसेंबर ०८ पर्यंत
योग : वृद्धि – १६:२४ पर्यंत
करण : वणिज – १३:०२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २३:४० पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : धनु – ०७:४४ पर्यंत
राहुकाल : १५:१५ ते १६:३८
गुलिक काल : १२:३० ते १३:५३
यमगण्ड : ०९:४५ ते ११:०७
अभिजितमुहूर्त : १२:०८ ते १२:५२
दुर्मुहूर्त : ०९:१२ ते ०९:५६
दुर्मुहूर्त : २३:१२ ते ००:०४, डिसेंबर ०८
अमृत काल : १८:२२ ते १९:४९
वर्ज्य : ०९:३७ ते ११:०४
वर्ज्य : ०३:५६, डिसेंबर ०८ ते ०५:२६, डिसेंबर ०८

सैनिकांसाठी निधीचे संकलन एका विशिष्ठ दिवशी करण्यात यावे व त्याचा विनियोग माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी व्हावा असा निर्णय जुलै, इ.स. १९४८ मध्ये घेतला. २८ ऑगस्ट, इ.स. १९४९ या दिवशी संरक्षण मंत्रालयाच्या समितीने ७ डिसेंबर या दिवशी ध्वजदिन साजरा केला जाईल असे ठरविले.
७ डिसेंबर यादिवशी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात.

या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत.
आज भारतीय लष्कर ध्वज दिन आहे

आज आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन आहे

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
• १९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर , १८७३)

अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅाव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला.
नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती.

छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
• २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन. ( जन्म: १७ जून, १९५१ )

 • घटना :
  १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.
  १८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
  १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

• मृत्यू :
• १९७६: विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन.
• १९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन. (जन्म: १७ जून १९०३)
• १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म: १६ जुलै , १९१३ )

 • जन्म :
  १९०२ : भारताचे पहिले कसोटी यष्टिरक्षक जनार्दन ग्यानोबा तथा जे. जी. नवले यांचा जन्म . १९३२ इंग्लड दौऱ्यात भारतीय संघाच्या एतिहासिक पहिल्या कसोटी सामन्यात नवले हे पहिला चेंडू खेळला.६५ भारतीय लढतीत त्यांनी यष्ट्यांमागे १३७ बळी टिपले. मात्र आयुष्याच्या सरत्या काळात त्यांनी साखर कारखान्यात चौकीदाराची नौकरी करावी लागली. ( मृत्यू : ७ सप्टेंबर १९७९ )
  १९२१: स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट, २०१६)
  १९२९: दरवर्षी ३१ डिसेंबरला नवे नाटक आणण्याचा पायंडा पाडून तो त्यांनी कसोशीने पाळनारे मोहन वाघ छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार यांचा जन्म ( मृत्यू : २४ मार्च, २०१०)

आपला दिवस मंगलमय जावो
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here