बुलडाणा येथील काॅंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका इशरत परवीन मो.अजहर व त्यांचे पती मो.अजहर मो.एजाज यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रविकांतभाऊ तुपकरांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’ त प्रवेश…!

0
21

💥 गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी

बुलडाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला.. या सोहळ्यात विविध पक्षाच्या जिल्हाभरातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’त पक्षप्रवेश केला.. बुलडाणा नगर परिषदेतील काॅंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका इशरत परवीन मो.अजहर (प्रभाग क्र.२ मिर्झानगर) यांनी संघटनेची वाट धरली.. सोबतच त्यांचे पती मो. अजहर मो. एजाज व शेकडो कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश संपन्न झाला…

जिल्ह्यातील प्रस्थापित पक्ष आणि नेते मंडळींपेक्षा सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना एक आशेचा किरण वाटते आहे.. येत्या काळात बुलडाणा नगर परिषदेची निवडणूक असणार आहे.. तेव्हा ‘स्वाभिमानी’ देखील ताकदीनिशी निवडणूकीत उतरणार आहे..

आतापर्यंत संघटना फक्त शेतकऱ्यांचीच आहे असं म्हटलं जायचं.. परंतु स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून गावखेड्यांतीलच नव्हे तर शहरांतील नागरिकांसाठीही स्वाभिमानी सदैव धावून जाते.. आपली समस्या घेऊन आलेला कुठलाच माणूस येथून खाली हात जात नाही.. सर्वसामान्यांसह इतर पक्षीय कार्यकर्त्यांना देखील आता आपला पक्ष जवळचा वाटू लागला आहे.. म्हणूनच यापुढेही अनेक दिग्गज मंडळी टप्प्या-टप्प्यात संघटनेत प्रवेश घेणार आहेत असे रविकांत तुपकर यांनी संबोधित केले…

यावेळी रशीद कुरेशी, शेख जफर, शेख रशीद शेख रफिक, नासीर भाई, साबीर भाई, इरफान खान, अजीम सर, बाबू भाई, निषाद खान, जुनेद शेख, शेख शाहरुख, अली भाई, काशिफ, आकीब शेह्बाज, काशिफ, अदनान, मुजफ्फर सर, बाबू मिस्तरी, शानू भाई, बबलू चायनीज, सहाद खान, शेख अरमान, शेख इम्रान, शेख आरिफ, सैय्यद आझम, रेहान खान, रेहान कुरेशी, अलीम शेख, मधुकर गंगाराम, अझीम भाई, तोह्सीफ भाई, आसिफ कुरेशी, अस्लम भाई, शेख हसन, अलीम शहा, शेख आसिफ, शेख अनिस, छोटू उस्ताद, शेख इम्रान, समीर खान, शेख तस्लीम, हाफिज खान, शेख इरफान, मो.साहेब, शेख अन्सार, शे. आरिफ, शेख आतीर, शेख सत्तार, समाधान शेळके, पिंटू सोनुने, शेख समीर, इब्राहीम पटेल यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here