गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी
शेगांव तालुक्यातील जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत महिला डॉक्टरांनी आशा वर्कर यांना उद्देशून अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या व त्यांना तुमचा माज मीच उतरवणार !असे ऊर्मट दरडाऊन सर्व आशा भगिनींचा अपमान केल्या प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की 22 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात जलम प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेहा मॅडम यांनी आशा वर्कर यांची बैठक बोलावली होती सध्या एसटी बसेस चालक वाहक यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातून अनेक आशा वर्कर महिलांना खासगी वाहनांमधून प्रवास करून येथे पोहोचावे लागले अनेक आशा वर्कर बघीन नाही वेळेवर न पोहोचू शकले नाही डॉक्टर नेहा मॅडम ह्या संतप्त झाल्या व त्यांनी उपस्थित अशा भगिनी यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून तुम्ही माझी नरेंद्र मोदी कडे तक्रार केली तरी मी भीत नाही तुमचा माझ मीच उतरवणार तुमचे नवरे सॉलिसिटर झाले काय असे सांगून आशा भगिनींचा पान उतारा केला व अपमानास्पद वागणूक दिली या घटनेने ची माहिती करताच शेगाव तालुका आशा वर्कर संघटनेने तीव्र संताप व्यक्त करून दोषी असलेल्या डॉक्टर नेहा मॅडम यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुरेखा पवार यांनी केली आहे