आयआयटी साठी निवड झालेल्या कु.सायली संदीप गोंड हिचा कुणबी समाज कर्मचारी सेवा संघाने केला सन्मान !

0
25
यशाचा पासवर्ड मिळविण्यासाठी आत्मविश्वास व घरच्यांची साथ मिळाली ! कु.सायली संदीप गोंड

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज खामगांव प्रतिनिधी

खामगांव शहरातील व्यवसायिक संदीप श्रीराम गोंड  यांची मुलगी कु.सायली संदीप गोंड ची आय.आय.टी.(I.I.T.)रूरकी उत्तराखंड येथे अभ्यासक्रमा करिता निवड झाल्याबद्दल जगद्गुरू संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद व लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन करून आयोजित छोटेखानी कार्यक्रमात कु.सायली व श्रीराम गोंड,सुनंदा गोंड,संदिप  श्रीराम  गोंड,वैशाली संदिप गोंड,वनिता लाहुडकर या  परिवारातील सदस्यांचा  कुणबी समाज कर्मचारी सेवा संघाचे संस्थापक जेष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण जवकार साहेब, सुभाषराव टाले साहेब,वासुदेव मुऱ्हे साहेब,संस्थापक अध्यक्ष अरूण भगत, संस्थापक सचिव रामेश्वर जोहरी,संस्थापक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अढाव,कार्याध्यक्ष लक्ष्मण मुंडे ,कोषाध्यक्ष रविंद्र कापसे,तालुका उपाध्यक्ष नितिन गायगोळ साहेब, सुनिल लाहूडकार साहेब  यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.   आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी,आत्मविश्वास व घरच्यांची साथ असेल तर कोणतेही यश शक्य आहे व त्यातूनच आपण आपले ध्येय सहज साध्य करू शकतो.माझ्या आई-बाबांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात व ऑनलाईन क्लासेस च्या काळात माझ्याकडे मोबाईल न देता माझा जो अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले असे मनोगत सायली ने  व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक सचिव रामेश्वर जोहरी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थापक कोषाध्यक्ष रविंद्र कापसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here