नांदुरा शहरात मॉं जिजाऊ जयंती निमित्य आ. राजेश एकडे यांचे ऊपस्थितीत अभिवादन सोहळा संपन्न !

0
56

रोषण आगरकर, ऊपसंपादक जगदिश न्युज

नांदुरा शहरात माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच नांदुरा द्वारा दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता माॅं जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.

सकाळी १० वाजता किसान मेडिकल समोरील मैदानवर मलकापुर मतदार संघाचे आमदार राजेशभाऊ एकडे, लालाभाऊ ईंगळे,केमिष्ट संघटनेचे प्रेमचंद जैन यांचे हस्ते माॅं जिजाऊ साहेब, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

मॉं जिजाऊ सावित्री विचार मंच सालाबादा प्रमाणे यंदाही नांदुरा ते सिंदखेड राजा पायी मोहिमेचे आयोजन ६ जाने . ११ जानेवारी सिंदखेड राजा येथे जिजाऊ अभिवादन करून परत नांदुरा कडे मार्गस्थ नियोजन केलेले होते . परंतु कोरोनाचे सावट गडद होत चालल्या मुळे ; या पायी मोहिम ने मध्येच ग्राम डोंगर खंडाळा येथुन परत फिरण्याचे ठरवले . तसेच जिजाऊ सृष्टी नियोजन समितीचे पुरुषोत्तमजी खेडेकर सिंदखेड राजा यांनी केलेल्या आवाहनानुसार व शासनाचे कोरोना प्रतिबंध नियमा नुसार नांदुरा शहरातच मॉं जिजाऊ साहेब जयंती सोहळ्याचे आयोजन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रमुख मान्यवरांसह ५० मावळ्याचे ऊपस्थीती लाभलेली होती.
याप्रसंगी सामुहिकरित्या माॅं जिजाऊ वंदना घेण्यात आली. नंतर विचार मंच चे प्रवक्ते डॉ शरद पाटील ( सृष्टी नेत्रालय नांदुरा ) यांनी सुत्र संचलन केले.

आमदार राजेशभाऊ एकडे यांनी कार्यक्रमात बोलतांना माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच च्या माध्यमातुन वर्षभरातील विविध विधायक समाजकार्याचा गुण गौरव करित त्यानी मॉं साहेबां बद्दल चे आपले मनोगत व्यक्त केले . नतंर न . प . पाणी पुरवठा सभापती अजय घनोकार यांनी माॅं जिजाऊ – व स्वामी विवेकानंद – यांचे बद्दल बोलतांना आजच स्व .शिवशंकरभाऊ पाटील यांच्या आजच्या जयंती दिना बद्दल आर्जऊन ऊल्लेख केला. तसेच सावित्रीमाई च्या शैक्षणिक कार्याचा त्या काळातील त्यांचा संघर्ष विदीत केला .

अजयभाऊ घनोकार, आपले मनोगत व्यक्त करतांना

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच चे मुख्य संघटक अशोकराव घनोकार, डाॅ. शरद पाटिल,अमर पाटील, बाळासाहेब पवार , मिलींद पाटील सर , पवन बाठे , किशोर देशमुख कुलदीप डंबेलकर , प्रमोद हिवाळे , भागवत मुंढे , सुभाष लांजुळकर , सुरेशसेठ रामचंदाणी , विनोद वनारे , गजानन बाठे , सतीश आडोळकर , जगदीश मोहनानी , राजु भाऊ , अनंत उंबरकर , डोफे सर , नागेश डुकरे , धनंजय देशमुख , सोनु धामोळकर , ज्ञानदेव काटे सर , सौ . वेरुळकर मॅडम , वेरुळकर भाऊ , हर्षवर्धन घनोकार , मुकुंदा घनोकार , गिरीष बाठे , गजानन घनोकार , भगत सर , कैलास उगले , विष्णू तांगडे , पवन खंडारे , अमोल पाटील , दिपक रुमाले , विठ्ठल अहिर यांचेसह अनेक जिजाऊ प्रेमी उपस्थित होते अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख जगदिश आगरकर यांनी एका प्रसिध्दीपत्रका द्वारे दिली आहे .

नेत्रतज्ञ डाॅ. शरद पाटिल साहेब कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करतांना
नांदुरा तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अमरदादा पाटिल व सहकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here