सुरेश उतपुरे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !

0
138

कैलास काळे, जगदिश न्युज मलकापुर प्रतिनिधि

मलकापूर दि.१३ फेब्रुवारी तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घिर्णीचे शिक्षक सुरेश उतपुरे यांना जिल्हा परिषद बुलढाणा द्वारे दिला जाणारा सन २०२०-२१ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. एकच ध्यास, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह सर्वांगीण विकास ह्या ध्येयासाठी कार्य करणारे आणि त्यासाठी विविध उपक्रमांतुन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करणार्या सुरेश उतपुरे यांच्या प्रयत्नातुन २०१० मध्ये मुंदेफळ ता. मेहकर येथील २८ पैकी १४ विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती मध्ये पात्र ठरले. त्यातील एक मुलगी ३०० पैकी २९८ गुण घेऊन राज्यात दुसरी आली. तसेच २०१८ ते २१ मध्ये जि. प .शाळा घिर्णीचे एकूण ३५ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती पात्र ठरवून शासनाकडून प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवून दिली. तसेच तालुक्यातील घिर्णीची शाळा एन एम एम एस मध्ये महाराष्ट्रातून दुसरी व जिल्ह्यातून प्रथम क्रमांकांवर आणन्याचा बहुमान मिळवून दिला. तसेच तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा करण्यात सहकाऱ्यांच्या मदतीने उतपुरे यांची महत्त्वाची भूमिका आहे . यासोबतच विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत वन डे वन प्रयोग, वन डे वन ऍक्टिव्हिटी,अभ्यासिका, ग्रंथालय, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल वर्ग, ज्ञानरचनावाद, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, स्वयंशासन, विविध जयंती, दिनविशेष, संगणक कक्ष, लोकसहभाग, शून्य टक्के गळती, शंभर टक्के उपस्थिती, ऑनलाइन शिक्षण, झूम व गुगल मिट क्लास, गुगल फॉर्म, टेस्ट डेमोज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे शैक्षणिक व शिक्षणपुरक विविध उपक्रम राबविणार्या सुरेश उतपुरे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल जिप बुलढाणा शिक्षण विभागाने घेऊन त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here