जे सी आय खामगांव जय अंबे च्या वतीने राष्ट्रीय युवा दिना निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन !

0
29

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज खामगांव

जे सी आय खामगांव जय अंबे ही सामाजिक संस्था नेहमीच समाजाच्या प्रत्येक विभिन्न क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. त्याचाच एक भाग म्हणून जे सी आय युवा सप्ताह चे औचित्य साधुन स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ साहेब भोसले जयंती निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंधाचे विषय – 1) स्वामी विवेकानंद यांचे जीवनातून युवा पीढिने घ्यावयाचे धड़े
2) राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांचे जीवनातून युवा पीढिने घ्यावयाचे धड़े
वरील दोन्ही विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर कमीत कमी 600 शब्द व त्यापेक्षा अधिक शब्दामध्ये निबंध लिहून 7030063007 या मो.नंबर whatsapp द्वारा पाठवावे.
सदर स्पर्धेचा कालावधि हा दि. 12-01-2022 ते 18-01-2022 पर्यंतचा असून या तारखे पर्यंतच निबंध स्विकारण्यात येतील.
सदर निबंध whatapp वर पाठवताना त्या सोबतच स्वतः चे पूर्ण नाव, वय, पत्ता व मोबाइल नंबर लिहून पाठवावा.
सदर स्पर्धे मध्ये कोणतीही वयो मर्यादा नसून नोंदणी फी सुद्धा नाही.सदर निबंध स्पर्धा हिंदी व मराठी भाषेत राहिल.
स्पर्धे मधील उत्कृष्ट 6 निबंध लिहणाऱ्या स्पर्धकाना पुरस्कृत करण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन गौरवन्यात येईल. अधिक माहिती साठी 7030063007 या मोबाइल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन जे सी आय खामगांव जय अंबे च्या अध्यक्षा जेसी डॉ शालिनी राजपूत,सचिव जेसी सौरभ चांडक,कोषाध्यक्ष जेसी योगेश खत्री तथा मनोनीत अध्यक्ष जेसी अँड रितेश निगम, सचिव जेसी कौस्तुभ मोहता, कोषाध्यक्षा जेसी नम्रता लाठे द्वारा करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here