पतंग उडवताना …..नायलॉन मांजाचा वापर टाळा ! स्वत:सह इतरांची ही काळजी घ्या !!

0
76

१४ जानेवारी मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याचा उत्साह कमालीचा असतो.पतंग उडविण्याचा आनंद अनेक जण घेत असतात.आनंद जरुर घ्यावा, पण आपल्या आनंदामुळे इतरांचे व पर्यावरणाचे काही नुकसान तर होणार नाही याचीही काळजी आपण घ्यावी. पतंग उडविण्यासाठी पतंग आणि धाग्याची गरज असतेच. परंतु पतंग उडविण्याच्या धाग्यात अलीकडच्या काळात प्रचंड बदल घडून आला आहे. संध्या पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर उडताना दिसतो. काहींच्या जीवित्वास जबर धक्का पोहोचू शकतेा. नायलॉन मांजामुळे ठिकठिकाणी अपघात घडल्याचे आपण बऱ्याच वेळा वाचले व ऐकले असेल, नायलॉन मांजामुळे काही लोकांना, पक्ष्यांना जीव सुद्धा गमवावा लागल्या च्या बातम्या आपल्या पर्यंत पोहोचल्या असतीलच. शिवाय पतंग उडविणारांच्या हाताला, बोटांना दुखापत झाल्याचे आपण सर्रासपणे पाहतो. पतंगाचा नायलॉन मांजा अनेकदा झाडे, इमारती, विजेच्या तारा इत्यादींवर अडकून पक्षांना दुखापत होते व कधी कधी त्यांना जीवही गमवावा लागतो. नायलॉन मांजा एक गंभीर समस्या बनू पाहत आहे त्यामुळे वेळीच सतर्क होणे व योग्य उपाय योजने काळाची गरज बनत आहे.

पतंग उडवा, आनंद घ्या, इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्या, पण सामाजिक भान मात्र नक्की ठेवा. पतंग उडवू नका असे कोणीच म्हणणार नाही, पण पतंग उडविण्यासाठी अतिशय जल्लद असलेला नायलॉन मांजा न वापरता इतर दुसरा धागा वापरावा, नायलॉन मांजाचा बहिष्कार करावा, नायलॉन मांजा याची कोणीही खरेदी वा विक्री करू नये, पर्वी मिळायचे तसे धागे दुकानदारानी दुकानात ठेवावे. जेणेकरून कोणाच्याही जीवास हानी पोचणार नाही व पर्यावरणाला बाधा होणार नाही. अशा स्वरूपात पतंग उत्सव साजरा करावा. आनंद वृध्दींगत होईल जेव्हा आपण पशुपक्षी, प्राणी आणि पर्यावरणाचा विचार सोबत ठेवून पतंग उडवूउडवू. म्हणूनच पतंग उडवताना काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निलेश देशमुख, नांदुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here