तरूणाई चे सलाईबन आता झाले बोलके !महाराष्ट्रातील पहिला प्रयोग !! टॉकींग सालइबन अ‍ॅप विकसित….

0
65

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी

सातपुडा पर्वत रांगेतील ऐतिहासीक वारशासोबतच आदिवासी पाडे आणि पुरातन झाडे बोलती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या ‘टॉकींग सालईबन’ अ‍ॅपद्वारे विविध वस्तू बोलक्या झाल्याने सातपुड्याची पर्वत रांग आता पर्यटनासाठी अतिशय मनोरंजक पध्दतीने खुली झालीय.
बुलडाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील विविध ऐतिहासीक स्थळ, आदिवासी पाडे आणि पुरातन झाड बोलती करण्याचा प्रयत्न टॉकींग सालईबन या अ‍ॅपद्वारे करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात पेâब्रुवारी २०२० मध्ये भारतातील पहिला टॉकींग ट्री अ‍ॅप विकसित करण्यात आला.
त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ आणि डी.व्ही. देशमुख यांच्या पुढाकारातून तसेच मनजितसिंह शिख, उमाकांत कांडेकर यांच्या सहकार्यातून ‘टॉकींग सालइबन’ हा अ‍ॅप दयांपूर येथील प्रा.सारंग धोटे यांनी विकसित केला.
त्यामुळे आता सातपुडा पर्वत रांगेतील ऐतिहासीक वारसा आणि झाड बोलकी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आदिवासी पाडेही झालीत बोलकी
सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी पाडे, नद्या, धबधबे, पुरातन वटवृक्ष आणि सालइबनमधील ऐतिहासीक शांती शिल्प, कुटी, सालई आणि अंजन वृक्षांना क्यूआर कोड देण्यात आला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील इंटरनेट शिवाय चालणारा अ‍ॅप विकसीत झालाय. यामध्ये वडपाणी गावा सोबतच आदिवासी पाडेही बोलू लागतील.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
क्यूआर कोड स्वॅâन केल्यानंतर अ‍ॅपद्वारे स्वॅâन करणाNयाचे नाव विचारले जाते. त्यानंतर बारकोड असलेला वृक्ष, वारसा संबंधिताचे स्वागत करून स्वत: बद्दलची ठराविक माहिती देते. माहिती सांगून झाल्यानंतर पर्यावरण रक्षण आणि वृक्षारोपणाचा संदेश दिल्या जातो. 

दर्यापूर येथे टॉकींग ट्रीच्या प्रयोगानंतर बुलडाणा येथे टॉकींग सालइमन अ‍ॅप विकसित केला आहे. ऐतिहासीक वारसा बोलता आणि मनोरंजनात्मक करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. यातून पर्यावरण रक्षणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.अशी माहिती प्रा. सारंग धोटे, जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापुर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here