पूर्णा नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा लोंढा आल्यामुळे जानोरी मेळ चे पोलिस पाटील रामकृष्ण पघरमोर गेले पुराचे पाण्यात वाहून !

0
69

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी

बाळापुर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या जानोरी मेळ येथील पोलिस पाटील रामकृष्ण बळीराम परघरमोर वय अंदाजे ६० वर्ष हे पूर्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या आपल्या शेतात गेले होते ते सायंकाळी ५:३० वाजताचे दरम्यान शेतातून परत येत असताना नदीच्या पात्रात अर्ध्या पर्यत आल्यानंतर अचानक खूप मोठा पाण्याचा लोंढा आल्यामुळे ते वाहून गेले असून याबाबतीत उरळ पोलिस स्टेशन ला त्यांचे लहान भाऊ रुपराव बळीराम परघरमोर यांनी माहिती दिली असून उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहिती दिली असून आता रात्रीचा अंधार झाल्यामुळे उद्या सकाळ पासून शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here