संपूर्ण स्वावलंबनाचे स्वप्न नानाजी देशमुख यांनी सर्वांसमोर ठेवले !ग्रामायण विवेकानंद जयंती समारोहात अभय महाजन यांचे प्रतिपादन !!

0
53
श्री अभयजी महाजन, सरचिटनीस दिनदयाल शोधसंस्थान, चित्रकुट

पवन प्रशांत आगरकर, जगदिश न्युज, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर, जानेवारी 2022

संपूर्ण स्वावलंबनाच्या नानाजी देशमुख यांच्या कल्पनेने गोंडा चित्रकोट आणि भिंड परिसर विकासने झगमगला स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतला तरुण समाज शिल्पी दांपत्याचे माध्यमातून या भागात घडत गेला . अशा आशयाचे प्रतिपादन चित्रकूटच्या दीनदयाल शोध संस्थान चे सरचिटणीस अभय महाजन यांनी आज ग्रामायणचा वर्धापन दिन आणि. स्वामी विवेकानंद, जिजामाता जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना येथे केले.
प्रारंभी, किशोर केळापुरे यांनी प्रास्तविक व अभय महाजन यांचा परिचय करून दिला. त्यानंतर ॲड्. जयश्री आलकरी यांनी ग्रामायणच्या वर्षभरातील संपूर्ण कार्याचा अहवाल मांडला.
अभयजींनी श्रद्धेय नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी यांचे स्मरण करीत, स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील भारतीय संस्कृती आणि जड आणि चैतन्यात ईश्वर बघणाऱ्या परंपरेतील विकासाचे सूत्र विसरलेल्या भारतीयांना परत त्यांच्या पूर्व स्मृतीची आठवण करून देण्याचे तत्व नानाजी देशमुख यांनी त्यांच्या कार्यातून कसे उभे केले, याची साद्यंत माहिती अतिशय सूत्रबद्ध रीतीने सर्वांसमोर मांडली. स्वामी विवेकानंदांच्या आणि त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस, गुरु माता शारदा देवी यांच्या काही स्मृतींना उजाळा देत, गुरु आणि गुरु माता यांनी दिलेल्या संदेशा प्रमाणे विवेकानंदांनी सुरू केलेले कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न जणू नानाजी ने केला, असे ते म्हणाले.
नानाजी देशमुख चित्रकूटला आले त्यावेळी ते 75 वर्षांचे होते, 1990 /91 मध्ये नानाजी देशमुख यांनी आल्यानंतर सर्वप्रथम स्वावलंबनावर जोर दिला. त्यासाठी त्यांनी महत्त्वाचे पाच मुद्दे ठरविले, एक कोणीही रिकामा राहता कामा नये, प्रत्येकाच्या हाताला काम, शिक्षण ,प्रशिक्षण,आरोग्य, स्वदेशीचावापर, स्वाभिमान, त्यादृष्टीने ग्रामोदय विश्वविद्यालय स्थापन केले. ज्यात सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता. 110 विभाग असलेल्या या विश्वविद्यालयात प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. याविषयी विद्याला मिळणारा प्रतिसाद आणि यशस्विता यावरुन पुढे उद्भवलेल्या विद्वेष आणि विरोधामुळे त्यांनी हे विश्वविद्यालय मध्यप्रदेश सरकारच्या स्वाधीन केले. मात्र त्यांच्या ग्रामोदयाच्या, स्वावलंबन कल्पनांवर त्यांचे कार्य सुरू होते. भौतिक साधने स्थानिकच असावी आणि ती उपलब्ध असलेल्या आपल्या देशातील साधनसामुग्री नुसार निर्माण व्हावी असे नानाजींचे मत होते, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. चित्रकूट ला आल्यानंतर त्यांनी पन्नास किलोमीटरचा परिसर आपले कार्यस्थळी म्हणून निवडला. विविध भागात फिरून कार्यकर्ते तयार करणे, परिसराचा अभ्यास करणे यातून त्यांना पोटात अन्न आणि हाताला काम असल्याशिवाय स्वालंबन होऊ शकत नाही या निष्कर्षाप्रत पोहोचावे लागले. त्या दृष्टीने काय करता येईल याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिय याचा विसर पडलेल्या भारतीय जनतेला याची आठवण करून देणे त्याचा उपयोग करून स्वावलंबी होणे कसे गरजेचे आहे, यासाठी जागृती करणे सुरू झाले, बाहेरून येणाऱ्या पुढे हात पसरणाऱ्या जनमानसाला त्याच्या हातांची ताकत, कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक होते. ग्रामोदय मंडळ , भजन मंडळी, ग्राम विकास मंडळे अशा विविध समित्या स्थापन करून जनजागरणाचे कार्य सुरू झाले. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याचा संकल्पना ब्रिटिशांनी विचारपूर्वक भारतीयांमध्ये रुजवले होता.मात्र त्यावर आधारित उद्योग, प्रक्रिया याबाबत त्यांना अनभिज्ञच ठेवले, त्यामुळे त्याची व्याप्ती वाढवणे गरजेचे होते. निसर्गावर आधारित शेती, पाण्याचे दुर्भिक्ष, या स्थितीत पाण्याची उपलब्धता करणे आवश्यक होते, त्यादृष्टिने 1250 हेक्टर मध्ये वॉटर शेड तयार करण्यात आले. त्यांच्या दृष्टीने युवकांना प्रोत्साहित करून गावकऱ्यांच्या मदतीने , शेतीशी निगडीत नवनवीन कार्यक्रम राबविण्यात आले. वर्षाला एकच वेळ पीक घेण्याची पद्धती बदलून दोन ते तीन वेळा शेतीची पिके घेण्यात येऊ लागली त्यामुळे उत्पन्न वाढले,. मात्र उत्पन्नासोबत सामाजिक आर्थिक व्यवहारीक, आर्थिक स्तरही वाढणे गरजेचे होते त्यादृष्टीने. समाज शिल्पी दांपत्य ही कल्पना राबविण्यात आली. यात पदवीधर असलेल्या तरुण दाम्पत्याने कुठलीही प्रसिद्धी श्रेय किंवा स्वार्थ मनात ठेवून कार्य न करता, समर्पित भावनेने कुटुंबा -कुटुंबात जागृती निर्माण करण्याचे कार्य. गावात गावकऱ्यांप्रमाणेच राहून करावे, जेणेकरून आपल्या सामाजिक दायित्वाची पुर्ती होऊ शकेल, अशा विचाराने प्रेरित झालेली असावी, अशी अपेक्षा करून आवाहन करण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला, आणि अनेक दांपत्ये या कामात कार्यरत झाली. जनजागृती मध्ये त्याचा अतिशय मोठा लाभ झाला. गावागावांमध्ये सांस्कृतिक केंद्र ,बाल शिक्षण संस्कार केंद्र सुरू झाले. लोकांमध्ये परस्पर चर्चा व्हायला लागल्या. शेतीचे पाणी व्यवस्थापन, देखभाली मध्ये तरुण मुले कामे करू लागले. श्रीरामांची तपस:थली नानाजी देशमुख यांची कर्मस्थली झाली. हजारो कार्यकर्त्यांचे हात या कामात लागले. आणि आजही ते सुरू आहे. परंपरिक शेतीसोबत वनोपजाबाबत, गावकऱ्यांना जागृत करण्यात आले. या भागातील प्रसिद्ध आवळे, प्रताप गढी, काळी मुसळी, पांढरी मुसळी. आणि इतर अतिशय महत्त्वाच्या वनोपजा बाबतीत जागृती घडवून आणून, त्यावर प्रक्रिया करणे, आजवर होणारी फसवणूक टाळून, योग्य भावाने त्यांना दर मिळवून देणे, अशी अनेक प्रकारची कार्य सुरू झाली, अंधश्रद्धा आणि अनेक गैरसमजुतीमुळे होणारा बालकांचा मृत्यू दर टाळण्यासाठी शिल्पी दाम्पत्यांनी मोठे काम केले. या जागृतीमुळे आज बालकांचा मृत्यू दर दोन-तीन टक्क्यांवर आलेला आहे. याशिवाय जात प्रथम आणि इतर कुप्रथा यांनाही तिलांजली मिळाली आहे. गरीब-श्रीमंत उच्च असा भेद जवळ जवळ संपत आले आहे. याची सर्व जगभर विविध पद्धतीने नोंद घेण्यात आलेली आहे. शासनानेही याबाबत दखल घेत अनेक समाजसुधारणांचा उपयोग शासकीय निर्णयांमध्ये करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पण इतर अनेक नामवंतांनी या प्रकल्पाबाबत विशेष उद्गार काढलेले आहे. विदेशातून अनेक मंडळींनी याचे कौतुक केलेले आहे, श्रद्धेय नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी, यांनी सध्या डॉ. हेडगेवार यांच्या कल्पना दिलेले मूर्त स्वरूप आज आपण पाहतो आहोत, असे ते म्हणाले.
या आभासी कार्यक्रमात, ग्रामायण चे अध्यक्ष अनिल सांबरे, उपाध्यक्ष, चंद्रकांत रागीट, सचिव संजय सराफ ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here