
🚩जय जिजाऊ🚩
सामान्यतः मनुष्य त्यांच्या निजी गरजां करिता म्हणा किंवा सामाजिक बंध जोपासण्या साठी म्हणा तसेच त्याच्या रहिवासी ठिकाणा व्यतिरिक्त तो ईतर बाहेरची , दुर – सुदुर कोसो अंतरा वरची ठिकाणे पाहण्या करिता , तेथील वेगळे पणातून आंनद मिळवण्या करिता किंवा ज्ञानात भर पाडण्या करिता म्हणा ; अशा एक ना अनेक कारणांनी प्रवास करणे हा मानवी जिवनातील एक अभिन्न भाग बनला आहे .
पूर्वी मानव सुद्धा इतर प्राण्यां प्रमाणे स्थलांतरीत जिवन जगत असायचा . परंतू जस जसा मानवाच्या आकलन शक्तिचा विकास होत गेला . तो कायम वस्ती करून , नागरी जिवन जगू लागला . परंतू त्याच्या सर्वच गरजा तो राहत असलेल्या वस्तीतच पूर्ण होतील असे कधीच झाले नाही , होणारही नाही ! तेव्हा त्याला त्याच्या गरज पूर्ती करिता ईतर ठिकाणां वरील वस्तु आणने – नेणे या करिता प्रवास करणे आवश्यक होऊन बसले . तसेच ईतर ठिकाणचे नाते – गोते यांचे सोबत सुख-दुख मधे भाग घेणे करिता सुद्धा प्रवास करणे होऊ लागले . आता तर शिक्षणाचे कारणाने सुद्धा देश – विदेशात जावे लागते . या करिता सुद्धा प्रवास हा नित्यांचा झाला आहे .
प्रवास हा प्रत्येक मानवाच्या जिवनातील अविभाज्य घटक असला तरीही ; प्रत्येकच व्यक्ति त्यांची स्वतःची वाहन व्यवस्था उभारू शकेल असे होत नाही . त्याला त्याची ही गरज पूर्ण करण्या करिता सहयात्री / सहप्रवाशी सोबत केल्यास फायद्याची , सुरक्षेची ठरू शकते . असे लक्षात आले . तेव्हा काही सक्षम लोकांनी – कंपन्यांनी जास्त प्रवासी वाहुन नेता येतील अशी मोठ्या आकाराची त्यांच्या खाजगी वाहना द्वारे प्रवाश्यांची वाहतूक सुरु केली होती . तेव्हा लोकांना यांचा काही कडु – गोड अनुभव यायला लागला होता . यातुनच एक कल्पना उदयास आली ती अशी की , ही प्रवासाची वाहने सहकार तत्वावर चालविल्यास पुर्ण राज्य भर एकाच प्रकारची वाहतूक व्यवस्था उभी राहील . जनतेचा प्रवास आणखी स्वस्त , सुरक्षित , वेळेचे बंधन पाळून तसेच सहकारी तत्वावरचा असल्या मुळे प्रत्येकच प्रवास करणारा जणू काय मालकी हक्काने त्या मधून प्रवास करेल . असाच काहीसा मानस ठेऊन , ” राज्य परिवहन मंडळ “, उदयास आली होती .
रापम उदयास आली व पूर्ण राज्यभर सडक / रस्ता तेथे बस पोहोचविणे . हे उद्दिष्ट ठेवून रापम च्या बसेस धावायला सुरुवात झाली . सहकारी तत्त्वावर असल्या मुळे त्या वर काम करणारी माणसे जसे चालक , वाहक , नियत्रंक , तांत्रिक ही योग्य प्रशिक्षित करून तसेच समाजातील गरजूंना त्यावर नोकरीस लावून त्यांचे पगार – त्यांचे संसाराला हातभार लावण्याचे काम या महामंडळ च्या माध्यमातून उत्तम रित्या सुरू झाले . तेव्हा जनतेच्या मनात या रापम विषयी आपुलकी , आपलेपणा निर्माण झाला होता . परंतु काहीच काळात जनतेचे स्वप्न भंग व्हायला लागले होते . या जगात ग्रहण लागणे हा सूर्यमालिकेतील नियम इथे सुद्धा लागू व्हायला लागला होता .
सहकारी तत्त्वावर म्हटली की , तिथे शासकीय नियमाच्या नुसार अध्यक्ष – उपाध्यक्ष – सदस्य – कार्यालयीन कर्मचारी हे सर्व शासकीय निकषावर निवडले जातात . यांचे हाती सर्व व्यवस्थापन दिल्या जाते . तेव्हा अशा पदावर असलेल्या लोकांनी जनहिता साठी काम करीत राहिल्यास ; ती यंत्रणा अबाधित व अव्याहत सुरू राहू शकते . परंतु लोकशाहीत मात्र या गोष्टीचा मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेणे . ही एक आम बाब बनत चालली आहे . पदावरील अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचारा मुळे संबंधित यंत्रणा दिवसेंदिवस खगंत जात असते .
” यथा राजा तथा प्रजा ” , या प्रमाणे पाहिल्यास या महामंडळाचे सुद्धा असेच झाले . ज्या राज्य सरकारांच्या छत्रछाये खाली , आशीर्वादाने ही महामंडळे कार्यान्वित झाली . तेच सरकारे यांचे सोबत भस्मासूरा सारखे वागायला लागलीत . जनतेच्या वास्तव – अवास्तव मागण्या पूर्ण करण्या करिता , सरकारी योजना राबविण्या करिता , मतांचे राजकारण जपण्या करिता , प्रत्येकच सरकारांनी या महामंडळाला – रापम ला ते करण्यास – राबवण्यास सांगीतले . या मधे अलग अलग कारणांनी प्रवासी दरा मध्ये सवलत . राजकीय वाहतुकी करिता यांचा उपयोग करून घेणे . शाळा तसेच तत्सम संघटनेची अल्प दरां मध्ये वाहतूक करून देणे . शाळेतील मुलींना मोफत प्रवास करू देणे . निवडणुकीच्या वेळेस या प्रवासी बसेसचा उपयोग करून घेणे . असे एक ना अनेक उपक्रम सरकारी म्हणून परिवहन कडून करवून घेतल्या गेले . हे सर्व करतांना महामंडळाला लागणारा खर्च – घसारा सरकारी तिजोरीतून देण्याचे सुद्धा ठरलेले असते . परंतू देंगे – दिलायेंगे करत पाच वर्ष निघून जातात . सरकार बदलते . योजना बदलतात . मागील देणे नंतरच्या नव्या सरकारला महत्वाचे वाटत नाही . अश्या प्रकारे रापम सारखे महामंडळे नागवली जाऊ लागली .
शासनाचा हलगर्जी पणा पाहून महामंडळांचे अधिकारी , पदाधिकारी यांनी सुद्धा मनमानी करणे सुरु केले . यांचे स्वतः वरील बेलगाम खर्च – दौरे सुरु झाले . बसेस च्या देखभाली च्या खर्चाच्या नावा खाली तिला लागलेले पार्ट – टायर ट्युब – नटबोल्ट सहित सर्व गोष्टी फक्त कागदांवर खरेदी केल्याचे दाखवले जाऊ लागले . गाड्यांना दुरुस्त न करताच , टायर रिमोल्ड बसवून त्या भल्याबुऱ्या रस्त्यांवर धावण्यास – चालवण्यास लावल्या . अश्या प्रकारे शासनाचा दगा व पदाधिकाऱ्यांची ऐश मुळे या महामंडळ ला लोक महाबंडल म्हणू लागलेत .
रा .प .म . चे कार्यालयीन स्वरूप पाहता . प्रत्यक्ष रस्त्यांवर धावून कमाई आणून देणारे चालक – वाहक यांना सुद्धा एक प्रकारची उदासिनता निर्माण व्हायला लागली . यांना सुद्धा आपुलकी व धाक न राहिल्या मुळे यांनी बसेस पळवताना प्रवासी न उचलणे व उतरवणे , योग्य ठिकाणांवर प्रवासी मिळविण्या करिता प्रयत्न न करणे . तसेच प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक न देता . साहेबी थाटा मध्ये वावरणे ! अक्षरशः वृद्ध लोकांना सीटवर न बसू देता प्रवासी वाहन जोरात हाकणे . प्रवाशा कडे असलेल्या सामानास चढ-उतार करताना मदत न करणे . हातभार न लावणे . वरून अरेरावी करणे . या मुळे सुद्धा दिवसें-दिवस , एके काळी प्रिय असलेल्या सामान्यांच्या या लाल परी चे विषयी प्रवाशांना उदासीनता निर्माण व्हायला लागली होती . अशातच शासना कडून परवानाधारक इतर छोटी प्रवासी वाहने रस्त्यावर उपलब्ध व्हायला लागली होती . त्यांचे कडून प्रवाशांना मिळत असलेली सहकार्याची स्थिती पाहता .प्रवाशांनी पुन्हा एकदा परवानाधारक या छोट्या वाहनां कडे त्यांचा मोर्चा वळवणे केव्हाच सुरू केले होते . परिणाम स्वरूप या लालपरीला प्रवासी भारवहन कमी प्राप्त व्हायला लागला होता . त्या मुळे मिळकती मध्ये खड्डा पडणे हे ओघानेच आले होते . वर पासून खाल पर्यंत बेबंदशाही , भ्रष्टाचार व कर्मचाऱ्यांची उदासीनता . या मुळे ही लाल परी , आजची बंद पडलेली लाल परी केव्हाच जनतेच्या मनातून लोप पावलेली आहे . आणि त्या मुळेच सामान्य जनता या बंद पडलेल्या लाल परी करिता रस्त्यावर उतरून ; शासनास ती सुरू करावी . असे सांगण्याच्या अजिबात ही मानसिकतेत नाही . हेच सिद्ध होते .
या लाल परीच्या संपात उतरलेल्या सर्व कर्मचाऱ्यां च्या एकजुटीने , मेहनतीने पुन्हा या लालपरीला चांगले दिवस येऊ शकतात . फक्त त्यांनी जनते साठी काम करावे . जनतेच्या – प्रवाशांच्या सोयी साठी काम करावे . स्वतःचा साहेबीपणा बाजूला ठेवून यांनी काम केले असते तर ; आज जनता या खेडोपाडी फिरणाऱ्या , लालपरी साठी रस्त्यावर उतरून अक्षरशा लालेलाल झाली असती . अजून ही वेळ गेलेली नाही . पुन्हा नव्या जोमाने या कर्मचाऱ्यांनी स्वायत्त योजना राबवून व महामंडळाला पूर्णपणे स्वतःची नियम राबवून चालविल्यास , शासनाची लुडबुड सहन न करता चालविल्यास , शासकीय योजना न राबवता चालविल्यास . खरोखरच जनतेच्या हिताच काम होईल . यात शंका नाही . अगदी बसेस मध्ये सुरुवातीचे लिहिलेले वाक्य , ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” . हे पुन्हा खरे होईल असे वाटते .
जय महाराष्ट्र – जय हिंद
अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .