विद्यापीठ नामांतर लढा सोळा वर्षे अविश्रांत लढणे ही बाब माझ्यासाठी विलक्षण होती !अशांतभाई वानखेडे

0
40

कैलास काळे, जगदिश न्युज प्रतिनिधी मलकापूर

शहरातील भिमनगर मधे नामविस्तार दिनानिमित्त नामांतरवादी नेते अशांतभाई वानखेडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना अशांतभाई वानखेडे यांनी विद्यापीठ नामांतराच्या इतिहासाला थोडक्यात उजागर केले.
शैक्षणिक दृष्टीने मराठवाडा अत्यंत मागे असतांना १९४९ साली बाबासाहेबांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली.या आधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना हैद्राबाद येथे उच्च शिक्षणासाठी जावे लागत होते.मिलींद च्या प्रेरणेमुळे मराठवाड्यात अनेक महाविद्यालये व पुढे विद्यापीठ स्थापन झाले.

या विद्यापीठास नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन असतांना अनेक नावं पुढे आलीत ती बहुदा प्रादेशिक होती त्यात छ.शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशी दोन नाव पुढे आली असता छ.शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच विद्यापीठ असल्याने २७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने टाळ्यांच्या गजरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ नामांतर ठराव संमत केला राज्यभर आनंद साजरा करण्यात आला मात्र या आनंदाचे दुसऱ्याच दिवशी २८ जुलै १९७८ ला विसर्जन झाले मराठवाड्यातील चारही जिल्ह्यात दंगली ऊसळल्या तो विकृत प्रसंग न आठवलेलाच बरा, बाबासाहेबांच्या नावाला विरोध झाला.
२८८ आमदारांच्या विधीमंडळाने बिनविरोध समंत केलेल्या ठरावाची अंमलबजावणी रखडली.
विधीमंडळाची इभ्रत राखल्या जावी,लोकशाही मुल्यांचा सन्मान रहावा म्हणून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाला सुरुवात झाली ती तब्बल १६ वर्षापर्यंत चालली.प्रा.जोगेंद्र कवाडेंनी नागपूर ते औरंगाबाद असा लाँगमार्च काढला तर बाबा आढाव यांनी नामांतरासाठी समता दिंडी चे आयोजन केले.या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी अनेकांनी जीव गमवावा लागला तर अनेकांनी आत्मबलीदान केले.बुलडाणा जिल्ह्यातील कु.प्रतिभा तायडे या मुलीने नामांतरासाठी विष प्राशन करुन दि.३० डिसेंबर १९९३ रोजी आत्मबलीदान केले.याबाबत लिहलेला मजकूर मला पाठविला मी बुलडाणा पोहोचलो माझ्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले नगर व मिलींद नगर येथील असंख्य महिला-पुरूषांनी पंचशिल चौकात रास्तारोको आंदोलनाला सुरूवात केली.पाहता पाहता सबंध जिल्हा पेटून उठला ! अमरावती डीआयजी ना बुलडाणा गाठावे लागले.जून्या आरटीओ कार्यालयाजवळ प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक करून वहनांचे नुकसान केले.जिपोअ श्री तुकाराम चव्हाण यांनी आम्हाला अटक केली १९९३ चा सुर्यास्त व१९९४ चा सुर्योदय मी माझ्या ५२ (संजय जाधव सहीत) कार्यकर्त्यांसह बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाहिला. माझ्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्ह्यात हे आंदोलन अत्यंत प्रखरतेने लढल्या गेले.कु.प्रतिभा च्या आत्मबलीदान आंदोलनाचा भाग म्हणून दलित मुक्ती सेनेचे माझे सहकारी कार्यकर्ते लोणवडी येथील कोळी समाजाचे श्री देवेशराज बावस्कर,दलित मुक्ती सेना मेहकर तालुका अध्यक्ष भाई कैलास सुखदाणे,रिधोरा येथील आनंद वानखेडे सारख्या कार्यकर्त्यां पदाधिकारी यांनी रक्ताने स्वाक्षरी करुन तत्कालीन मुख्यमंत्री मा.शरद पवारांना निवेदनं पाठवून आत्मबलीदान करण्याचा इशारा दिला.बुलडाणा जिल्ह्यातील शहिद प्रतिभा तायडेच्या आत्मबलीदानाचे नंतर पेटलेल्या आंदोलनाची दखल बीबीसी लंडन या वृत्तसंस्थेने घेतली. आत्मबलीदान करणाऱ्यामधे जातीचा धरबंध नव्हता,होते ते समतेचे तत्त्व ! आंदोलनाच्या प्रखरते समोर सरकारला नमावे लागले व १६ वर्षाच्या अविश्रांत संघर्षाला
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” अशा नामविस्ताराची प्राप्ती झाली.त्यावेळी मी दलित मुक्ती सेनेचा बुलडाणा जिल्हाअध्यक्ष होतो.एका पिढीने लढलेल्या सोळा वर्षाच्या या विलक्षण संघर्षात मी माझ्या असंख्य सहकारी आंदोलनकर्त्यासह अविश्रांत लढलो याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन “समतेचे निळे वादळ” या सामाजिक संघटनेचे संस्थापक अशांतभाई वानखेडे यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम इंगळे हे होते.सत्कार कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळाच्या वतीने श्री अशोक सरदार यांनी केले.प्रास्तविक मोहन खराटे यांनी तर सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन दिलीप इंगळे यांनी केले.सदर प्रसंगी निवडक महिला कार्यकर्त्या हजर होत्या रतनसुत्त पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
१४/जानेवारी/१९९४
दुपारी १२ वाजता मलकापूर येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पर्वतराव पोहारकर यांनी दुरध्वनीवरुन माहिती दिली की आज दुपारी ४ वाजेपर्यंत नामांतराची घोषणा होणार
मग आम्ही भिमनगर मलकापूर जि.बुलडाणा येथून डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यत विजयी मिरवणुक काढली सुमारे दोन हजाराचा समुदाय सामिल होता विनापरवाणगीने मिरवणुक काढली म्हणून तत्कालीन मलकापूर शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री राजदेवराव राजूरकर यांनी मी व पत्नी सौ.छाया वानखेडे अशा दोघांच्या विरोधात मुपोका १३५ नुसार गुन्हा दाखल केला ज्यात आम्ही जमानत ही दिली नाही अन् हजर ही झालो नाही … आंदोलनाचा खटला म्हणून महाराष्ट्र सरकारने काढून घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here