
कैलास काळे, जगदिश न्युज प्रतिनिधी, मलकापुर
अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव यांना गुप्त माहिती मिळाली कि मलकापुर शहरात मोठ्या प्रमाणात चोरून लपुन वरली मटका सट्टा चालविला जात आहे. सदर वृत्ताची शहानिशा करण्याचे दृष्ट्रिने पोलिस पथक सर्क्रिय झालेले होते.
त्या प्रमाणे मा अपर पोलीस अधीक्षक सा. खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील पो.हे. कॉ . गजानन बोरसे , पोलीस नाईक गजानन आहेर , रघुनाथ जाधव , संदिप टाकसाळ , पो.कॉ. राम धामोडे यांनी मलकापुर येथील
गजानन टॉकीज समोर व मोहनपुरा परीसरात चालविल्या जाणार्या वरली मटका नामक सट्टा चालविणार्या वर छापा टाकून शेख फारुक शेख कासम रा.मोहनपुरा, योगेश मधुकर कराळे रा.मोहनपुरा, आकाश सुभाष सुरंगे रा.सालीपुरा,नवलसिंग राजेंद्रसिंग राजपुत रा.सालीपुरा, मोहम्मद गुफरान शेख रमजान रा.पारपेठ मलकापुर असे एकुण 5 आरोपी व 19820/-रु
मुद्देलाम जप्त करुन आरोपी विरुद्ध पो स्टे मलकापुर शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रस्तुत कारवाई अरविंद चावरिया साहेब ( भा.पो.से. ) पोलीस अधीक्षक , बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्रवण दत्त एस ( भा.पो.से. ) , अपर पोलीस अधीक्षक , खामगांव यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक कार्यालय , खामगांव यांचे पथकातील पोलीस पोलीस अंमलदारांनी केली आहे.