वैष्णवी पवार यांना युवा समाजरत्न पुरस्कार जाहीर !

0
61

कैलास काळे, जगदिश न्युज प्रतिनिधी मलकापुर

माँ जिजाऊ फाउंडेशन , वाशीम (महाराष्ट्र राज्य ) तर्फे दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराकरीता बुलडाणा जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या युवा सामाजिक कार्यकर्त्या तसेच माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या महिला विभाग प्रमुख आणि आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समिती रायगड जिल्हा युवती प्रमुख कृ. वैष्णवी पवार यांची निवड करण्यात आली आहे.जिजाऊ फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणार्‍या ह्या पुरस्काराकरीता महाराष्ट्र भरातुन विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असुन पुरस्कार वितरण सोहळा १० मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. वैष्णवी पवार यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात येताच जिल्हाभरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here