टिपु सुलतान चौक परीसरात गोवंश कत्तल करणार्‍या आरोपींना हिवरखेड पोलिसांनी रंगेहात पकडले !

0
1094

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी, हिवरखेड

२३ जानेवारी २०२२ रोजी पहाटे हिवरखेड पोलीस ठाण्याचे दबंग ठाणेदार धिरज चव्हाण यांना गोवंश कत्तली बाबत गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले पोलीस पथक, व पंचासमक्ष ग्राम बेलखेड येथील येथील टिपु सुलतान चौकात परीसरातील रहिवाशी शेख फकीरा शेख कादर कुरेशी, रा. बेलखेड हा त्याचे राहते घराच्या ओसरीत त्याचा साथीदार नामे शेख गणी शेख बशीर कुरेशी, (वय-३२ वर्षे,) शेख कलीम शेख फकीरा, (वय १८ वर्षे) दोन्ही रा. बेलखेड यांचे सह सुरा घेवून तेथील जामिनीवर रक्ताच्या थारोडयात पडलेल्या गोवंशाची कत्तल करीत असतांना रंगेहात मिळुन आले.

सदर घटनास्थळी एका गोवंशाची मान व चारही पाय कापलेल्या अवस्थेत व चामडी काढलेल्या अवस्थेत दिसुन आले होते. सदर प्रकरणी गोवंशाचे अंदाजे ०१ क्विंटल २० किलो वजनाचे गोवंशाचे धड, मान, चार पाय, व कातडी भुरकट लाल रंगाची एकुण किंमत अंदाजे २४,००० /- रू. किंमतीचे गोवंश मांस तसेच कत्तलीकरीता वापरण्यात आलेले एक लोखंडी पात्याचे संत्तुर सुरा ,कि.अंदाजे. १००/- रू, दोन कुऱ्हाड किंमत २५०/ रू, अशी रक्ताने भरलेले हत्यारे असा एकुण २४, ३५०/- रू. किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळी जप्त करण्यात आला असुन तिन्ही आरोपींविरूध्द अपराध नं. ०८/२२, कलम ४२९, ३४ भादंवि सह कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धिरज चव्हाण, पोउपनि सुनिल बगळेकर, पोहेकॉ श्रीकृष्ण सोळंके, सुमन, निलेश खंडारे, विलास अस्वार, सर्वेश कांबे, धिरज साबळे, गणेश कवळे, प्रदिप तायडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here