वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्याचे हाल

0
38

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतीनीधी हिवरखेड

स्थानिक हिवरखेड परीसरातील झरी फिडर गेल्या अनेक वर्षा पासुन वरलोडच्या ग्रहनाखाली चालू आहे या फिडरचे ग्रहण केव्हा सुटणार व शेतकऱ्याचे होणारे हाल केव्हा थांबणार असा प्रश्न येथील शेतकऱ्याना पडला आहे दर वर्षी मान्सून पुर्व कपाशीच्या वेळात झरी फिडर ओवरलोड होते व आणि आता हिवाळ्याच्या सुर्वातीला म्हणजेच गहू, हरबरा, भूईमूग ,पेरनीच्या वेळात हे फिडर ओवरलोड होते त्यामुळे शेतकऱ्याना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागिल आठवड्यात झरी फिडर हे दहा तास चालायचे मात्र ऐन रब्बी हंगामात लागवड केली जाते अशा वेळात हे फिडर ओवर लोड होऊन वारवार बंद पडत आसल्याचे कनिष्ठ अभियंता कुमार यांनी सांगितले झरी फीडरवरील ओवरलोड गेल्या अनेक वर्षा पासुन होत आहे मात्र स्थानिक विजवितरण कंपणीच्या नियोजन शुन्य कारभारा मुळे शेतकऱ्याना नाहकचा त्रास सहन कराव लागत आहे झरी फिडर वारवार ओवर लोड होत आहे त्यामुळे तेथे 33 के व्ही उपकेन्द्रहि मजुर झाले आहे मात्रमात्र पाणी कुठे मुरत आहे हेच समजायला मार्ग नाही या संदर्भात पालक मंत्री तसेच आमदार मोहदय या कडे गाभिर्याने लक्ष देतीलका अस प्रश्न झरी फिडरवरील सर्व शेतकर्‍याना पडला आहे


प्रतिक्रीया
1) मागिल अनेक वर्षा पासुन झरी फिडरवर ओवर लोडचा प्रश्न आहे वारवार तोडी तसेच लेखी तक्रारी करूनही स्थानिक विजवितरण कंपनी या विषयावर गंभीर नसून आम्हा शेतकऱ्याना नाहकचा मनस्ताप सहन करावा लागत आहे या गंभिर बाबीवर वरीष्ठानी लक्ष देऊन गेल्या दहा वर्षापासुन विजेचा चालू असलेला लपन डाव बंदकरावा १५ जानेवारी पर्यत झरी फीडर हे १०तास चालायचे मात्र ऐन रब्बीच्या हंगामात फिडर ओव्हर लोड होऊन बंद पडत आहे त्यात आता फक्त लाईन सहा तास चालत असुन शेतकन्यानी आपले बागायत कसे करावे याचा मोठा प्रश्न पडला आहे या बाबीनवर वरीष्ठानी लक्ष देऊन ग्राहकाना योग्य न्याय द्यावा जेनेकरून शेतकऱ्याना होनारा त्रास थांबवता येईल
शेतकरी दिपक राऊत

सध्या झरी फीडरवर सहातास विद्युत पुरवठा होत असून या सहा तासांमध्ये बागाईत कसे करावे व कोणत्या पद्धतीने करावे असा प्रश्न आम्हा शेतकर्‍यांना पडला आहे त्यामुळे संबंधित अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊ आम्हा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवावा तसेच झरी येथे ते 33के व्ही उपकेंद्राची मागणी असुन लवकरात लवकर पूर्ण करावीअशी मागणी शेतकरी सय्यद इरफान सय्यद मुकद्दर हिवरखेड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here