सर्दी – खोकला, थंडीतापाने तमाम महाराष्ट्रातील नागरिक परेशान ! ओ sss.. मायक्राॅन तर झाला तर नाही ना याची खमंग आवाजात घरीदारी चर्चा !!

0
145

सागर सव्वालाखे (जैन) जगदिश न्युज प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर :तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना सर्दी-खोकला-ताप यांच्यामुळे कणकण वाटल्यासारखे होत आहे. शहर तथा ग्रामीन भागातील संपूर्ण दवाखाने आजाराने गजबजली आहेत. सर्दी, खोकला, ताप, पडसे, डोकेदुखी, अंगदुखी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. ऋतु बदलल्याने सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. लहान मुले यामुळे त्रस्त आहेत. सर्दी-खोकला याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेक वेळा घातक ठरू शकते. असे काही डॉक्टरांनी यांनी व्यक्त केले. एखाद्या भयंकर आजार याची चाहूल असू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्दी खोकला कणकणल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे याला सिझनल अलर्जी या आजाराच्या रुग्णांना मागील काही दिवसात वाढ झाली आहे. याचा नाक – घसा आणि कान यांचा परस्पर संबंध असल्यामुळे सर्दी खोकला ही एखाद्या भयंकर आजार याची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपासून या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ऋतू बदलतो त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोकं वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसल्याने याचा सर्वात जास्त त्रास होतो. कुजबुज आणि श्वसन नलिकेत चे आजारही जडतात. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले.

कारणे काही का असोत पण ओ ss.. माईक्राॅन तर झाला नाही ना ! याची घरोघरी चर्चा होत आहे ! अनेकांनी टेस्ट केली तर बहुतांशपणे ,,पाजेव्टिव,, रिपोर्ट येत आहेत !!शाशकिय रूग्नालयात भरती होण्याचे काम नाही पण वैद्यकिय ऊपचार विनामुल्य ऊपलब्ध आहेत त्यामुळे घाबरून न जाता नागरीकांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here