🕉 || सुप्रभात ||आजचे पंचांग ( मंगळवार, जानेवारी २५, २०२२ ) युगाब्द : ५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक माघ ५ शके १९४३

0
11

सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२७
चंद्रोदय : ०१:०५, जानेवारी २६
चंद्रास्त : १२:०७
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – ०७:४८ पर्यंत
क्षय तिथि : अष्टमी – ०६:२५, जानेवारी २६ पर्यंत
नक्षत्र: चित्रा – १०:५५ पर्यंत
योग : धृति – ०९:१३ पर्यंत
क्षय योग : शूल – ०६:५२, जानेवारी २६ पर्यंत
करण : बव – ०७:४८ पर्यंत
द्वितीय करण : बालव – १९:१० पर्यंत
क्षय करण : कौलव – ०६:२५, जानेवारी २६ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १५:३९ ते १७:०३
गुलिक काल : १२:५१ ते १४:१५
यमगण्ड : १०:०३ ते ११:२७
अभिजितमुहूर्त : १२:२८ ते १३:१३
दुर्मुहूर्त : ०९:२९ ते १०:१४
दुर्मुहूर्त : २३:३४ ते ००:२५, जानेवारी २६
अमृत काल : ०१:३६, जानेवारी २६ ते ०३:०९, जानेवारी २६
वर्ज्य : १६:१९ ते १७:५२

” राजकीय प्रक्रियेत अधिक तरुण मतदारांना भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, सरकारने दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे युवकांना राजकीय मतदान सशक्तीकरण, मतदान करून अभिमानाची भावना तसेच मतदानाचा हक्क वापरण्यास प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.”
२५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
आज राष्ट्रीय मतदार दिन आहे

रमाबाई रानडे

न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ‘हिंदू लेडीज सोशल क्लब’ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील ‘सेवा सदन’ या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी ‘हुजुरपागा’ शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे.

इ.स. १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले. त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांदिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.

रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी इ.स. १९१३ मध्ये गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यांतून समाजसेवेच्या कार्यांत एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला.

इ.स. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर इ.स. १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.

इ.स. १९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. इ.स. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.

रमाबाईंच्या सन्मानाप्रीत्यर्थ भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९६२ ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले.
१८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म. ( मृत्यू : २५ मार्च , १९२४ )

 • घटना :
  १७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
  १८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
  १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
  २०१२ : एस टी बसचालक संतोष माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट बसस्थानकातून एसटी बस पळवून बेदरकारपणे चालवून मृत्यूचे थैमान घातले होते. या घटनेत नऊजणांचा मृत्यू झाला. तर, ३२ जण जखमी झाले. तसेच ४० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले होते.

• मृत्यू :
• १९५४: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १८८७)
• १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन. ( जन्म : २९ सप्टेंबर, १८९० )
• २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन. (जन्म: १२,ऑक्टोबर, १९१९)
• २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी,१९२७ )

 • जन्म :
  १९३८: नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.
  १९५८: पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो
🚩जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् 🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here