🕉 || सुप्रभात ||आजचे पंचांग ( सोमवार, जानेवारी २४, २०२२ ) युगाब्द : ५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक माघ ४ शके १९४३

0
23

सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२७
चंद्रोदय: ००:०८, जानेवारी २५ चंद्रास्त : ११:२९
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – ०८:४३ पर्यंत
नक्षत्र : हस्त – ११:१५ पर्यंत
योग : सुकर्मा – ११:१२ पर्यंत
करण : वणिज – ०८:४३ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २०:१९ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कन्या – २३:०८ पर्यंत
राहुकाल : ०८:३९ ते १०:०३
गुलिक काल : १४:१५ ते १५:३९
यमगण्ड : ११:२७ ते १२:५१
अभिजितमुहूर्त : १२:२८ ते १३:१३
दुर्मुहूर्त : १३:१३ ते १३:५८
दुर्मुहूर्त : १५:२८ ते १६:१२
अमृत काल : ०४:३६, जानेवारी २५ ते ०६:११, जानेवारी २५
वर्ज्य : १९:०८ ते २०:४३

आज राष्ट्रीय बालिका दिवस आहे

पंडित भीमसेन जोशी हे भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.

भीमसेन जोशीं वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता.

भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली.

उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

त्यांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

• २०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)

अणूविज्ञानाचे शिल्पकार – डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबई येथे सधन पारशी कुंटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये झाले.

१९२७ मध्ये त्यांनी केब्रिंज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९३० मध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३२-३४ या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिध्यवृत्ती मिळाली होती. १९३४ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळाली.
इ. स. १९३९ मध्ये डॉ. होमी भाभा सुट्टीकरिता भारतात आले होते, परंतु त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे नंतर ते भारतातच राहिले.

१९४० मध्ये त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी प्रपाठकपद स्वीकारले. हा विभाग डॉ. होमी भाभा यांच्याकरिता सर दोराबजी टाटा विश्वस्त निधीतून निर्माण करण्यात आला होता. १९४२ मध्ये तेथेच त्यांना प्राध्यापकपद मिळाले.

इ. स.१९४४ मध्ये म्हणजे हिरोशिमा शहरावरील अणुस्फोटाच्याही पूर्वी डॉ. होमी भाभा यांनी अणुऊर्जेचा वापर फक्त शांततामय उपयोगांकरिता व्हावा, असे विचार मांडले होते.

इ.स. १९४५ मध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे ते संचालक आणि सैद्धांतिक भौतिकी विषयाचे प्राध्यापक होते. १९४८ मध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.

ऑगस्ट १९५४ मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली. या खात्याचे सचिवपद भाभा यांच्याकडेच होते. या खात्याचे तुर्भे (मुंबई) येथील अणुसंशोधन केंद्र हे अणुसंशोधनाचे व विकासाचे प्रमुख केंद्र होते.

१९५६ मध्ये भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे येथे रशिया व्यतिरिक्त आशिया खंडातील पहिला अणुकेंद्रीय विक्रियक (अणुभट्टी) सुरू करण्यात आला. भारतामध्ये अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात डॉ. होमी भाभा यांचा मोठा वाटा आहे. १९६२ मध्ये अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना झाली.

इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अँप्लाइड फिजिक्स या संस्थेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रे व इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सभासद म्हणून भाभा यांनी काम केले. जुलै १९६५ पासून मृत्यूपावेतो ते भारत सरकारच्या मंत्रिमंडळाला सल्ला देणाऱ्या शास्त्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी समितीचे अध्यक्षपदसुद्धा त्यांच्याकडे होते. ते अनेक शास्त्रीय संस्थांचे सभासद होते.
१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले. ( जन्म : ३० ऑक्टोबर, १९०९ )

 • घटना :
  १८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.
  १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
  १९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
  १९४२: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
  १९६६: भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.
  १९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
  १९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.
  १९८४: अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

• मृत्यू :
• २००५: गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.

 • जन्म :
  १९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर ,२००० )
  १९४३: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो
🚩 जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् 🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here