प्रलोभनाला बघून विचलित होऊ नका !

0
25

मिशन समृद्धी

तुम्ही वाघाला शिकार करतांना बघितले असेल, समोर जेव्हा हजारो प्राण्यांचा कळप दिसतो तेव्हा वाघ त्या हजारो प्रण्यामधून कुठल्या एकाच प्राण्याची शिकार करायची ठरवितो.. नंतर फक्त त्याच प्राण्यावर लक्ष केंद्रित करतो.. हळूहळू दोघांमधील अंतर कमी करतो आणि शेवटी अटँक करतो.. तुम्ही अतिशय बारकाईने बघा, वाघ जेव्हा ठरविलेल्या प्राण्यावर हल्ला करतो तेव्हा दुसरे कितीतरी प्राणी वाघाच्या मार्गात येतात ज्यांची वाघ सहज शिकार करु शकतो पण वाघ ज्या प्राण्यावर एकदा लक्ष केंद्रित केले त्याच प्राण्याची शिकार करतो.. मधे कितीही सहज इतर प्राणी उपलब्ध झाले तरी तो विचलित होत नाही.

मित्रांनो..
वाघ, जर केंद्रित केली शिकार सोडून, दिसेल त्या शिकारीच्या मागे लागला असता तर आपल्या क्षेत्राचा राजा झाला नसता..
आपलं नेमकं इथचं चुकतय..
सकाळी अंबाणीबद्दल ऐकले.. उद्योगपती व्हायचे ठरविले..
दुपारी विराट कोहलीची मँच बघितली.. क्रिकेटर व्हायचे ठरविले…
संध्याकाळी श्री मोदीजींचे भाषण ऐकले कि नेता व्हायचे ठरविले..
म्हणजे ज्या ध्येयावर लक्ष केंद्रित करुन ते साध्य करायची वेळ येते.. आणि तुम्ही दुसरीकडे डायव्हर्ट होता..
कसे यश मिळणार..
तुम्हाला जर तुमच्या क्षेत्राचे राजे व्हायचे असेल तर.. फक्त आणि फक्त स्वतःचा व्यवसायच करा..

बाधवांनो, चला यशस्वी होऊ या..!!

आर. के. भेलके
विकास अधिकारी
एलआयसी खामगांव
मो नं 9881141440, 7588041721

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here