प्रतिकूल परीस्थितीतही जो अनुकूलता निर्माण करतो ! तोच खरा यशस्वी व्यवसायीक !!

0
23

मिशन समृद्धी..

शिखरावर चढलेल्यांचे आप़न फोटो पाहतो आणि त्यांचे कौतुक करण्याऐवजी आपल्या अपयशाची कारणे शोधतो..
उदा..
तो मँरेथान मधे पहिला आला कारण त्याला चांगले बुट होते..
तो सायकलींग मधे पहिला कारण त्याला चांगली सायकल मिळाली..
अशी अनेक सोईची कारणे शोधतो पण मुख्य कारण त्याने दररोज थंडी उन पाऊस मधे धावायची किंवा सायकल चालविण्याची प्रँक्टिज केली हे आपण सोईने विसरतो..
एक लक्षात ठेवा जे लोक यशाच्या शिखरावर पोहचले आहेत त्यांना सुद्धा तीच संकटे आली जे तुम्हाला येत आहेत किंबहुना तुमच्या पेक्षाही जास्त संकटे त्यांनी पार केली असणार.. तुमच्या मधे आणि त्यांच्या मधे फक्त एकच फरक आहे.. तो म्हणजे.. त्यांनी कधी संकटांना कारण बनू दिले नाही..

मित्रांनो..
इतरांपेक्षा आपण मागे का याची कारणे शोधण्यात शतकवीर आहोत..
समोरच्या जवळ पैसा जास्त आहे..
ते ग्राहकांना उधार देतात..
त्यांचा समाज त्यांना मदत करतो..
हि व इतरही कारणे सांगून आपण आपले समाधान करुन घेतो..
पण मित्रांनो.. कितीही संकटे आली तरी जो प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा अभिकर्ता..

बांधवांनो, चला यशस्वी होऊ या..!!

आर. के. भेलके
विकास अधिकारी
एलआयसी खामगांव
मो नं 9881141440, 7588041721

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here