द्वापार युगापासुन कलीयुगापर्यंत कष्टकर्‍याचे मेहेनतीने गोकुळातील दुधाची धारोष्नधार बरसतच आहे !

0
81

🚩 जय जिजाऊ🚩


द्वापार युगात गोकुळातील दुध दुभत मथुरेत शेतकरी विकायला न्यायचे .घरी न खाता !
उद्देश पैसा मिळावा .आता या कलीयुगात सुद्धा शेतकरी स्वत: चे कुटुंबाला लागणारे फक्त चहापाणी साठी लागणारे दुध वगळता आपल्या मुलानांसाठी ही न ठेवता ईतर सर्व दुधाचा थेंब अन थेंब दुधडेअरीला विकतो आहे !

ऊद्देश तोच द्वापार युगातील .
शरीरा साठी मूलभूत घटक देणारे पदार्थ विकून ,आलेल्या पैशातून संसारा साठी खर्च करणे .असे करत असताना शक्ति क्षिण झाल्या मुळे औषधोपचाराला पैसे लावणे .
याला कोणता ….पणा म्हणावा .
त्या काळी दूर द्रष्टा महापुरुष श्रीकृष्णाने दुभते घरी खावे असे सांगण्याचा खुप प्रयत्न केला . प्रसंगी चोरी करून खावे पण खावे . असे त्यांनी कृती द्वारे सुद्धा पटवून दिले होते . खाऊन राहीले ते विकावे . पण असे होत नाही . तेव्हा पण आता पण .
श्रीकृष्णाने जसे लोणी चोरले , जसे दुभते खाण्याची चंगळ केली व त्यांच्या सह इतरांना सुद्धा ते खाण्या करिता लावले . या विषयी सांगताना महाराज लोक फार अलंकारिक व कर्ण मधुर असे वर्णन करतात :आणि या कृतीला ते नटखट श्रीकृष्ण असा उल्लेख करतात . परंतु कुठल्याही महाराजने हा अर्थ का काढू नये कि , त्या काळच्या तल्लख बुद्धी असलेल्या व दूरदृष्टी असलेल्या या महापुरुषाला हे सांगणे होते की ; कष्टकरी शेतकरी वर्गाने त्याचे कडे असलेले सकस अन्न घटक शरीराचे मूलभूत पोषण करणारे पदार्थ न विकता . अगोदर ते स्वतः करिता वापरावे .पुढे शिल्लक राहिल्यास विकावे . महाराज लोकांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे समजावून सांगणे गरजेचे आहे . नाही तर उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ उत्पन्न करणारे कष्टकरी केवळ पैसा मिळावा म्हणून ज्या उद्देशाने दूध दुभते व आणखी इतर मौलिक सकस अन्न वस्तू विकणे . हाच उपक्रम राबवत राहतात . या शेतकऱ्यांना स्वतः विषयी परिवारा विषयी हा विचार का येऊ नये की , सकस अन्न खाणे व कष्टाचे काम करताना सुदृढ असणे .खूप अत्यंत महत्त्वाचे आहे .

आता तर दुधाचा थेंब अन थेंब दूरदूरच्या दुधडेऱ्यां मध्ये थेट ग्रामीण भागातून नेला जात आहे . हे डेअरी वाले शेतकऱ्यांना ६० ते ८० रुपये पर्यंत च्या भावा प्रमाणे दुधाचे पैसे देत आहेत . या मिळणाऱ्या जास्त भावाच्या लालसे-पोटी शेतकरी मूर्खपणा करत आहे . स्वतःच्या मुलांना सुद्धा प्यायला घोटभर सुद्धा दूध ठेवत नाही . तेव्हा इतर सर्व घरातील मोठ्या सदस्यां साठी काही विषयच नाही . वास्तविक शेतकरी या विषयी जी लागत लावून बसलेला असतो . तसेच दैनंदिन त्या दुभत्या जनावरा विषयी चा खर्च व या विषयी परिवारातील सदस्यांची मेहनत पाहता . त्याला त्या जनावरां पासून मिळणारे दूध ८०/- रु. लिटर पर्यंत पडते . परंतू या उत्पादकांची एकी नसल्या मूळे तसेच लागत मूल्यांकन काय आहे . याचे सुद्धा यांना व्यवहार्य ज्ञान नसल्या मुळे किंवा त्या बाबत काही स्वतःचे अंकेक्षण न करणे . लेखा जोखा न ठेवणे . लावले किती . आले किती . उरले किती . या बद्दल शेकडा २० टक्के कष्टकरी विचार करतात की नाही . शंकाच आहे .
” जिसका हिसाब नही, उसका कुछ भी सच्चा नही ” . अस काही अगदीच सामान्य दिसणारे पण व्यवहार चातुर्य ठेवून असणारे मळलेल्या कपड्याचे लोकांना पण लक्षात येते . तेव्हा ही सामान्य पण व्यवहाराचा आत्मा असलेली गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ नये . हे नवलच !
शेतकरी दादा चैतन्य विकतो बदल्यात जड घेतो . म्हणजे शरीराला चैतन्य देणाऱ्या वस्तु बदल्यात पैसे जमवणे व खोटी श्रीमंती दाखवणे या गर्तेत फसत – रुतत जातो . या वर थोडा तरी विचार यांनी करावा . असे पोट तिडकीने सांगावे वाटते . या मिळणाऱ्या पैशातून शेतकरी मिळवत असलेली धन संपदा याच्या व परिवाराच्या शरीर संपदे करीता कितपत उपयुक्त ठरते . तसेच सकस न खाल्या मुळे यांचे दवाखान्यात इलाजा करिता तोही दुष्परिणाम देणारा . या बाबत किती वायफळ खर्च होतो . या बद्दल आता स्वतःला शिक्षीत म्हणवणाऱ्या शेतकरी व कष्टकरी वर्गाने खरच गंभीर विचार करावा .
खाऊन – पिऊन सुदृढ शरीरयष्टी कमावली असेल तरच कमावलेल्या पैश्याचा उपयोग व आनंद घेता येईल . नाही तर दुध पुर्ण विकून झाल्यावर बकेट मधे राहीलेले दुधाचे वगळ पाणी टाकून , असे जिवन जगणे जर शेतकरी करीत राहील . तर ना त्याचे ना भारताचे भविष्य ठिक राहील .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here