जयंती जाणत्या राजाची ! मस्ती अजान रयतेची !!

0
124

जय जिजाऊ

१९ फेब्रुवारी ही तारीख म्हणजे मरगळ पळवून लावणारी अशीच . या दिवशी लाखोचा पोशींदा जन्माला आला होता . पोशिंदा म्हणजे फक्त पोट भरणारा – कमावून देणारा .या लहान अर्थाने न घेता . इथे पोशिंदा म्हणजे सर्वांच्या जीवनात जिवनावश्यक आन बाण शान निर्माण करणारा . असा अष्टावधानी ,अष्टोप्रहरी सजग व सतर्कतेणे तहहयात जीवन जगलेला . दिव्य भव्य विचारांचा . इतरांना या अशा विचाराने प्रेरित करणारा .असे मा साहेब जिजाऊ च्या पोटी जन्माला आलेले बाळ ; छत्रपती शिवराय . यांचा हा जन्म दिवस .

तब्बल ३५० वर्ष कालावधी सरकला आहे . या राज्याच्या कारकीर्दीला . पण अजुनही कुणीही फक्त एक ललकार , ” छत्रपती शिवाजी महाराज की ” , असे म्हणते न म्हणते तोच इतरांनी तेव्हढ्याच मोठ्यांदा गर्जून , ” जय ” म्हटलेच पाहीजे . अगदी सहज छत्रपती शिवरायांचे बाबत त्यांचा जयजयकार करणारे मावळे अजूनही आहेत . पोटाच्या बेंबी पासून जोर लावून , घशाला कोरड पडे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय – छत्रपती शिवाजी महाराज की जय – छत्रपती शिवाजी महाराज की जय . असे वारंवार व नथकता म्हणणारे या भारत भूमीत आहेत .अभिमानाची गोष्ट आहे .
परंतु आज काल च्या विज्ञान युगातील उपलब्ध सुखाच्या साधनां मुळे , बहुदा सर्वांचेच कष्ट न करता ; अति सुख भोगणे या वृत्ती कडे झुकने होत आहे . शिवरायांचे बाबत घसा पडे पर्यंत , त्यांचे गुण वर्णन करणारे .त्यांचे अचुक कामाच्या पद्धतीचे वर्णन करणारे . त्यांच्या कडून केल्या गेलेला अन्याया विरूद्ध च्या संघर्षाचे वर्णन करणारे .त्यांनी स्वतः वेळोवेळी शारीरिक ताण सहन करून केलेल्या संघर्षाचे गुणगान करणारे . शिवरायांचे आठवावे रूप आठवावा प्रताप . असे शिवजयंतीच्या वेळेस स्वतःचे पोस्टर लावून इतरांना भासवणे की , ते खरच किती मोठे शिव भक्त आहेत . छत्रपती शिवरायांच्या विचाराचे पाईक आहेत . छत्रपतींनी जगलेले खडतर जीवन यांनी जसेच्या तसे स्वतः करीता जगणे चालवले आहे .असे दाखविण्याचा यांचा आटापिटा असतो . छत्रपती शिवराय प्रमाणे दाढी मिशा ठेवणे . बोलताना अगदी राजेंच्या प्रमाणे बोलणे – चालताना – उठताना -बसताना त्यांच्या सारख्या कृती करणे . कार्यक्रमाचे ठिकाणावर मोठ-मोठ्या ऐतिहासिक स्थितीच्या , आणीबाणीच्या , युद्धांच्या गोष्टी सांगताना पूर्ण आवेशात येणे . असे काही वागतात – बोलतात की ऐकणारे – पाहणारे , भाऊ काय बोलतात ! म्हणून त्यांचे तोंडातील स्तुतीसुमने त्या भाऊं करीता उधळत राहतात . ऐकणारे कानाने संतुष्ट होतात . सांगणारे बोलून तोंडाने संतुष्ट होतात . ४ पोस्टर , ४० पोस्ट मोबाईलवर , ४ हजाराची लाइटिंग , ४० हजाराचे फटाके , ४ लाखाचे डीजे व पिणारांची पर्वनी अशी चंगळवादी विचारांची व कृतीची आता मात्र वाढ होतांना दिसत आहे .

भयंकर मोठ्ठ्या अन्यायी जुलमी कुख्यात शक्तिना नामोहरम करण्याचे कामाचा दृढ संकल्प घेतलेले राजे शिव छत्रपती यांनी लढा देण्यास सुरुवात केली . तेव्हा यांचे अस्तित्व अतिशय लहान होते . जसे महाकाय हत्ती पुढे एक पेशीय मायक्रोस्कोप मधून सुद्धा सहज न दिसणारा जीव , एक पेशीय अमिबा ! या प्रमाणे तुलनात्मक सांगता येईल . कल्पना करावी एव्हढी सुद्धा कल्पना आपण करू शकत नाही . ईतक्या त्रोटक युद्ध साहित्या सह अत्यंत कमीत कमी मावळ्यांच्या संग – सोबतीने व प्रत्येक शक्य असेल तिथे विना रक्तपात – जिवीत हानी टाळून , बुद्धि चातुर्याने – गनिमी काव्याने स्वराज्य विस्तारीले होते . शिवरायांचा आजचा काळात होणारा जय जयकार जितका सहज केला जातो . सोपा व सरळ वाटतो . तितका तो जगाच्या तोंडी बसवण्या करिता शिवरायांना सोपे गेले असेल . असे वाटून घेणे म्हणजे अश्या व्यक्तिंना हजारो मुर्खांचा मुख्याधिकारी समजावा . दुर्दैवाने आज बऱ्याच ठिकाणी शिवप्रेमी दिसणारे – त्यांची जंयती , राज्याभिषेक दिन गाज्या वाज्यात साजरी करतांना दिसणारी मंडळी पैकी ६० टक्के लोक चंगळवादी व दिखाऊ नकली चमक धमक प्रमाणे हे सर्व करतात . या दोन – चार दिवसा करीता यांच्यातील उफाळून आलेले शिव प्रेम लगेच जयंती व राज्याभिषेक दिन निघून जाताच बरोबर पूर्ण वर्षा करीता हे पुन्हा शिवराय विसरून जातात .

ईतिहासात आक्रमणकारी – दृष्ट लोकां बरोबर लढा देतांना , त्या काळच्या लोकांनी सोसलेले दिवस लक्षात घेतले तर आपला थरकाप उडावा असेच ऐकायला – वाचायला मिळते . महिनोगणती शत्रुच्या वेढ्यात राहणे . तुरुगवासात अटकणे . शत्रु पासुन गनिमीकाव्या नुसार युद्ध खेळतांना किर्र अधांर – धो – धो कोसळणारा डोगर रांगातील प्रलयंकारी पावसात रयतेच्या उज्वल भवितव्या साठी आड वाटेने सारखे पळत राहणे . बहुतेक सर्व मोहिमा अमावशे सारख्या किर्र जिवघेण्या अंधाऱ्या रात्रींचा सहारा घेऊन केलेल्या . आडवाट – खोल दऱ्यातून – गर्द झाडी झुडुपातून अश्याच . ना विचू – काट्या ची पर्वा केली . ना तहान – भूकेची तमा बाळगली . किती सांजा उपाशी राहले असतील . कोरड पडलेल्या घश्याला पाणी मिळेल की नाही याचा भरवसा नाही . खोकला – शिंक – जाभई – उसासे – कन्हने सारखे शारीरिक नैसर्गिक आवेग आवरतांना यांनी काय काय प्रयत्न केले असतील . खरच किती किती यांनी स्वतःची गैरसोय करून घेतली असेल . तेव्हा कुठे स्वराज्य स्थापल्या गेले असेल .

आज मात्र आम्ही या राजा चे हे काही उत्सव साजरे करणारे , स्वतःची कुठल्याही बाबतीत आबाळ – गैरसोय होऊ देत नाही . नाटकीय पद्धतीने दिखाऊ कार्यक्रम करतो आहे . असे दिन विशेष साजरे करतांना थोडा ऐतेहासिक घटनांचा पदर पकडून तसे करण्याचा प्रयत्न करणारास समाज साथ देत नाही . कारण ऐतेहासिक नुसार केलेला कार्यक्रम मधे जलवा नसतो . धांगळधिंगा करण्याची मुभा नसते . अश्या कार्यक्रमाचे आयोजक शिस्तीत व प्रसंगी खाण्या – पिण्याला महत्व न देता ; त्या कार्या करीता ते स्वतःला वाहून घेतात . तहान-भूक हरवून बसलेले हे अल्प संख्य पण नितिने व समाजा करिता खरे मार्ग दाखवणारे , चमक धमक शिवाय काम तडीस नेणारे एकाकी पडतात . यांना फारच कमीत-कमी लोक जुळतात . साधे काही कि . मी अंतर पायी चालण्याच्या मोहिमे मधे फक्त त्या एका दिवसा पुरती झालेली रणभण – खाण्यापिण्याची गैरसोय सुद्धा सोसुन न घेण्याची माणसिकता असलेले सुद्धा आज पाहायला मिळत आहेत . लगेच हे दिखाऊ लोक त्या ऐतेहासिक कार्यक्रमातून बाहेर पडतात . पुन्हा चंगळवादी व ईतिहास शुन्य , छत्रपती शिवरायांना सुद्धा रुचणार नाही अश्या धांगळधिंगा च्या ठिकाणांवर स्वतःचे मनमाने वृत्तीला कृतीत उतरवून धन्य होतात .
जुलमीं लोकांच्या मदमस्त झालेल्यांच्या वेळा , दारु , मादक पदार्थांचे सेवण करण्याच्या वेळी छत्रपतींनी गनिमी काव्याने त्या महा बलाढ्य शक्तिंना निर्बल करने . या प्रमाणे जगले होते . आम्ही मात्र आज त्यांचीच जयंती – राज्याभिषेक दिन साजरा करतांना दारू पिऊन कमरचा कमरा होईस्तो नाचतो आहोत . या नाच्यां पैकी ९५ टक्के नाचे साधे १० – २० कि मी . पायी चालणे . सतत २-५ कि मी . पळून दाखवणे . एका वेळी चार जणाची पाठ पाहणे . मानवीय किंवा नैसर्गिक आपत्ती च्या वेळी शिवरायांचे मावळे म्हणून इतरांचे प्राण रक्षक होणे . निदान शत्रुशी दोन हात करू शकत नाही . पण यांचा स्वतःचाच जिव वाचवण्या करिता हे २ कि.मी. सुद्धा पळून जाऊ शकत नाही . म्हणजे किती लाजीरवाने ! गनिमी कावा हे तंत्र ज्या जाणत्या राजाने आत्मसात केले होते . राबवले होते . असे करतांना पावलो-पावली दक्षता पाळली होती . आज मात्र खेदाने सांगावे लागते की , आम्ही त्या शिवरायांचे मावळे दारु पिऊन टुन्न झालेले असतो . बेसावध – बेजबाबदार व गलथान तसेच निर्बल झालेलो असतो . अश्या दिखाऊ जयंत्या व उत्सव बंद पाडणे अति आवश्यक आहे . परंतू मनोरंजन करून घेणाऱ्या आम जनतेस हेच चंगळवादी लोक व त्यांचे आयोजित कार्यक्रम चांगले वाटतात . इथे मात्र हात टेकतात .

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात घुमतोय ! आता वरील व्हिडीओ बघा !! ऊत्तरप्रदेश मधिल लखनौ शहरातील आहे !!! घशाला कोरड पडे पर्यंत शिवरायांचा जयजयकार ……..
सौजन्य साभार : लोकमत नागपुर (ट्विटर)

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here