संत गाडगेबाबा यांच्या जयंती च्या पूर्व संध्येला पद ग्रहण आणि सत्कार सोहळा !

0
142

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी

संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मुर्तिजापुर च्या वतीने सत्कार सोहळा संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गौरक्षण स्थळी मंगळवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी 3:50 वा. आयोजन केले आहे . संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मुर्तिजापुर च्या सिम्बॉल चे अनावरण करण्यात येणार असून या कार्यक्रमा ला सुप्रसिद्ध साहित्यिक , समीक्षक प्रा.डॉ.श्रीकांत तिडके उपविभागीय दंडाधिकारी मोहिते साहेब , प्रा.डॉ. संतोष हुशे , म.रा.साहित्य निवड , मंडळाचे सदस्य पुष्कराज गावंडे , संत गाडगेबाबा स्मारक समिती मुर्तिजापुर चे संस्थापक अध्यक्ष सुभाष टाले , समता परिषदेचे अध्यक्ष सदाशिव शेळके , दिलीप देशमुख , आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा यांचे पणतू सतिषभाऊ सोनोने , गायत्री प्रतिष्ठान अमरावतीचे राजेंद्र उंबरकर, प्रा.सुधाकर गौरखेडे , प्रा.प्रमोद राजंदेकर , प्र राजकन्या कनखने कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक सुनील पवार आदींची उपस्थिती राहणार आहे .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद तायडे , अनिल डाहेलकर , सौ.मीना ताई कवडे मिलिंद जामणिक , मनिष ठाकरे, मिलिंद इंगळे , श्रावणी टाले , नेहा मडकर , अनिल शुकला कार्यरत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here