🛑 25 लाखाची लॉटरी लागल्याचा पाकिस्तान मधील कॉल, मेसेज किंवा व्हिडीओ आल्यास सावधान !

0
39

गत 5-6 दिवसांपासून पाकिस्तान मधील +92 Country कोड असलेल्या व्हाट्सएप नंबर वरून अनेकांना “कौन बनेगा करोडपती” मालिकेत 25 लाखाची लॉटरी तुम्हाला लागली असल्याचा मेसेज किंवा कॉल किंवा व्हिडीओ आल्यास सावध रहा तसेच इतरांना सावध करा.

पाकिस्तान नंबर असलेल्या Whatsapp व्हिडीओ मध्ये सरकारी व्हिडीओ दिसावा म्हणुन राजमुद्रा असलेला सरकारी शिक्का असतो व भारतातील एका मोबाइल नंबर वर कॉल करण्यासाठी सांगितले आहे.

त्यावर कॉल केल्यास on-line फ्राड / फसवणूक करणारे 25 लाख तुमच्या बँकेत टाकण्यासाठी पुरेशी रक्कम नाही, इनकम टॅक्स प्रथम भरावा लागेल इत्यादी भूलथापा देतात व 3-4 वेळा वेगवेगळे कारण सांगून कधी 25 हजार तर कधी 50 हजार त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सांगतात व असे दीड-दोन लाख त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर त्यांना कॉल लागत नाही, मोबाइल बंद आहे असे उत्तर येते. व तेव्हा आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येते.

असेच On-line फ्राड करणारे एक तासात KYC करावी लागेल नाहीतर ATM कार्ड बंद होईल/मोबाइल वरून कोणालाही कॉल करता येणार नाही किंवा कॉल येणार नाही व KYC केली नाही तर नवीन मोबाइल नंबर मिळेल असे सांगून ATM कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, OTP मागतात काही बदमाश 10 रुपयांचे recharge करण्यासाठी एक app download करण्यासाठी सांगतात व 10 रुपयांचे re-charge झाल्यावर लगेच आपल्या बँक खात्यात सर्व रक्कम असे फसवणुक करणारे काढून घेतात.

अनेकांना महावितरण लोगो असलेला मेसेज येतो व त्यात सुद्धा एका app ची लिंक असते व app download केल्यावर बिल भरण्यासाठी OTP येतो व तो टाकताच बँक खात्यातील पैसे 2 मिनिटात गायब होतात.

अश्या On -Line फ्राड पासून आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या बँक/ATM, OTP बाबत माहिती अपरिचित व्यक्तीला देऊ नये. KYC साठी बँकेत जावे, वीजबिल महावितरण च्या अधिकृत वेबसाईटवर भरावे

आपण सावध रहा – इतरांना सावध करा.

हल्ली अनेक जण स्थानिक वर्तमानपत्र वाचत नाहीत त्यात अशा बातम्या असतात व TV वरील बातम्या मध्ये अश्या on-line फ्राड बाबत जास्त माहिती नसते व त्यामुळे अनेकांना हल्लीच्या काळात अशी on – line फसवणूक होत असल्याचे प्रकार होत असल्याचे समजत नाही व ते वेळीच सावध होत नाही

जनहितार्थ इतर गृप मध्ये share करा व आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना पोस्ट share करून सावध करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here